रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी नुकताच संपला. त्यांनतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी बरीच नावे चर्चेत होती. चर्चेनंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपतीपदासाठी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची, तर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. अशी घोषणा करण्यात आली.
Advertisements
पहिल्यांदाच एका महिला आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान येत्या २७ तारखेला सिन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.