वर्षभरात प्रकिया पूर्ण होणार ः देशातील पाचव्या क्रमांकाची आयटी कंपनी होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंजिनिअरिंग फर्म लार्सन ऍण्ड टुब्रो लिमिटेड (एल ऍण्ड टी) यांनी स्वतःची सॉफ्टवेअर फर्म माइंडट्री लिमिटेड आणि लार्सन ऍण्ड टुब्रो इंफोटेक लिमिटेड (एलटीआय) यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. 9 ते 12 महिन्यांमध्ये हा व्यवहार पूर्ण करण्यात येणार असल्याच सांगण्यात आले.
नवीन फर्मचे नाव एलटीआयमाइंडट्री होणार असून माइंडट्रीच्या 100 समभागांच्या बदल्यात एलटीआयचे 73 समभाग मिळणार आहेत. एलटीआयचे व्यवस्थापकीय संचालक जलोना हे राजीनामा देणार आहेत. माइंडट्रीचे सीईओ आणि एमडी देबासीष चटर्जी हे नवीन कंपनीचे काम सांभाळणार आहेत.
नव्या फर्मचा टर्नओव्हर राहणार मजबूत
एलटीआय आणि माइंडट्री दोन्ही इंजिनिअरिंग फर्म एल ऍण्ड टीच्या सहाय्यक कंपनी आहेत. एलऍण्डटी ने 2019 मध्ये माइंडट्रीचे नियंत्रण मिळविले होते. समूहाची कंपनीमध्ये जवळपास 61 टक्के हिस्सेदारी आणि बाजारमूल्य जवळपास 65,285 कोटी रुपये आहे. एलटीआयची जवळपास 74 टक्के हिस्सेदारी असून बाजारमूल्य 1.03 लाख कोटी आहे. विलीनीकरणानंतर कंपनीची उलाढाल 350 कोटी डॉलर आणि एल ऍण्ड टीची हिस्सेदारी 68.73 लाख कोटी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पाचवी आयटी कंपनी
बाजारमूल्याच्या हिशोबमधून नवीन फर्म टेक महिंद्राला मागे टाकत देशातील पाचव्या नंबरची आयटी क्षेत्रामधील कंपनी बनणार आहे. फर्म 80,000 पेक्षा जादा लोकांना रोजगार देणार असून यामध्ये 4,000 सेल्स आणि सपोर्ट पर्सनल्सचा समावेश होणार आहे.
………………