Annual fair of Madkhol Bharadevi today
माडखोल येथील श्री देवी भराडी वार्षिक जत्रोत्सव शनिवारी ७ जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे. सायंकाळी ६ वाजता सत्यनारायण महापुजा, आरती तीर्थ प्रसाद होणार आहे. रात्री ११ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा ( म्हापण ) कुर्मदासाची वारी हा नाटय प्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ओटवणे /प्रतिनिधी