Tarun Bharat

‘लोकमान्य सोसायटी’ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Advertisements

वर्षअखेरीस 14.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा

पुणे / प्रतिनिधी

 ग्राहक व सभासदांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवसायाच्या बळावर ‘लोकमान्य सोसायटी’ला वर्षअखेरीस 14.63 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे येथे जाहीर करण्यात आले. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’ची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पुण्यात पार पडली. त्यात वार्षिक आढावा मांडताना लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर यांनी याबाबत माहिती दिली.

 एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमान्य सोसायटी’चे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर होते. तर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपाध्यक्ष अजित गरगट्टी, प्रसाद ठाकुर, गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, प्रभाकर पाटकर, सौ सई ठाकुर-बिजलानी आदी संचालक मंडळ तसेच मुख्य वित्तीय अधिकारी वीरसिंग भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित, पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव व ठेवीदार-सभासद मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि’चे मुख्य कार्यालय बेळगाव येथून महाराष्ट्रात पुण्यामध्ये स्थलांतरित झाल्यानंतरची ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे या सभेला एक वेगळे महत्त्व होते. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे समन्वयक विनायक जाधव यांनी विषयपत्रिका सर्वांसमोर मांडली.

 त्यानंतर आपले मनोगत मांडताना ठाकुर म्हणाले, आतापर्यंतच्या प्रवासात सोसायटीने अनेक आव्हानांचा सामना करत यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. सभासदांचा विश्वास, पाठिंबा आणि सहकार्यबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. केंद्र शासनाने स्थापन केलेल्या स्वतंत्र सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्राच्या अनेकविध समस्यांचे निराकरण झाले असून, त्याने एक वेगळीच उंची गाठली गेली आहे. कर्मचाऱयांच्या प्रयत्नांतून संस्थेची भरभराट झाली आहे व भविष्यातही हेच अपेक्षित आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. लोकमान्य सोसायटीची भविष्यातील वाटचाल कशा रीतीने असावी, याविषयीही ठाकुर यांनी मार्गदर्शन केले.

 गरगट्टी यांनी संचालक मंडळाच्या वतीने संस्थेविषयी असलेली जबाबदारी स्पष्ट केली. भोसले यांनी ताळेबंदाची मांडणी केली, तर दीक्षित यांनी संस्थेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयनिहाय परिसरामधून शाखाविस्तार होणार असल्याची माहिती दिली. तसेच उपनियमांमध्ये तरतूद करत आदरातिथ्य व लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याविषयी भूमिका मांडली, ज्याला बहुमताने मंजुरी मिळाली.

 सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विनायक जाधव यांनी केले. या वेळी आयएक्सजी लॉजिस्टिक (आयसीएल कंपनीचे प्रादेशिक भागीदार) कंपनीबरोबर कुरिअर सेवेसाठी व्यावसायिक करार झाला.

Related Stories

म्हादईच्या प्रश्नावर भाजपाला जाब विचारा

Amit Kulkarni

होंडा नगरगाव केरी मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य सीलबंद

Patil_p

खानापूरची चोवीस तास पाणी योजना-भुयारी गटार योजना कामामधील सर्व अडचणी दूर करू

Amit Kulkarni

शाळा पुन्हा सुरू करणे प्राणघातक ठरू शकते : फालेरो

Patil_p

फोंडय़ाच्या विकासाचा दहा कलमी कार्यक्रम

Amit Kulkarni

मनपाकडून विनामास्क कारवाई सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!