Tarun Bharat

हिंदू तेली समाजाचा वार्षिक कार्यक्रम

प्रतिनिधी /वास्को

हिंदु तेली समाज गोवा संस्थेतर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. हेडलॅण्ड-सडा येथील श्री लक्ष्मी नारायण देवालयाच्या सभागृहात आयोजित  केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या वाडेनगर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा देसाई उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्य अतिथी सानिया सगुण बिचोलकर,  समाजाचे अध्यक्ष सुनील मांजरेकर व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी प्रमुख पाहुण्या व मुख्य अतिथींच्याहस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष सुनील मांजरेकर यांनी स्वागत केले.

यावेळी इयत्ता पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते नववी अशा तीन गटात चित्रकला, वेशभूषा व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा नमीता मांजरेकर, अनिल कुबल व राजश्री नागझरकर यांनी पुरस्कृत केल्या होत्या.

प्रमुख पाहुण्या प्रतिभा देसाई यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या देशनिर्मितीच्या योगदानाविषयी विचार व्यक्त केले. पालकांनी स्वतः व आपल्या मुलांना मोबाईलमध्ये जास्त व्यस्त न ठेवता मुलांना मैदानी खेळाकडे वळविण्यासाठी प्रवृत्त करावे. मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांचे भविष्य घडवावे असे विचार त्यांनी मांडले. संस्थेचे अध्यक्ष सुनील मांजरेकर यांनी कोरोना काळात मागील दोन वर्षे शालेय शिष्यवृत्ती सोहळा न झाल्याची खंत व्यक्त केली.

यावेळी संस्थेतर्फे कला अकादमी आयोजित अखिल गोवा भजनी र्स्प्धेत प्रथम पारितोषिक पटकावल्याबद्दल किशोर तोस्कर, केदार तोरस्कर, अनिकेत तोरस्कर, सचिन तोरस्कर व गणेश कोंडुरकर यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या प्रतिमा देसाई, मुख्य अतिथी सोनिया बिचोलकर, अध्यक्ष सुनील मांजरेकर, सचिव राजश्री नागझरकर व नमिता मांजरेकर यांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. पुर्णा चांदोस्कर यांनी केले तर नमिता मांजरेकर यांनी आभार मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे ः चित्रकला स्पर्धा ः पहिला गट – प्रथम – तेजस पेडणेकर, द्वितीय – शौर्या डिचोलकर, तृतीय – कुशांगी आंबेरकर, उत्तेजनार्थ – स्निग्धा कोरगांवकर. दुसरा गट – प्रथम – सिया पार्सेकर, द्वितीय – अमोल नाईक, तृतीय – समर्थ वेंगुर्लेकर, उत्तेजनार्थ – पल्लवी पालकर. तिसरा गट ः प्रथम – प्रथम भोसले, द्वितीय – आशमी जाधव. वेशभूषा स्पर्धा ः प्रथम – तेजस पेडणेकर, द्वितीय – अमोल नाईक, तृतीय – विधी पालयेकर. प्रश्नमंजुषा स्पर्धा ः प्रथम – सुनील कोरगांवकर, द्वितीय – दुर्वांकुर चव्हाण, तृतीय – काव्या मणेरकर.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे – इयत्ता पहिली ते नववी- तनवी गुरूदास पेडणेकर, प्रथम भोसले, सुरभि सुरेश कुबल, सलोनी निलेश डिचोलकर, शौर्या न. डिचोलकर, वेदा देवदत्त धामापुरकर, कनिष्का किशोर आंबेरकर, कुशांगी किशोर आंबेरकर, समर्थ नागझरकर व सानवी नागझरकर. इयत्ता दहावी – सुरभी सुरेश कुबल (मुरगांव), सर्वेश कुबल (मुरगांव), जान्हवी रवींद्र नागझरकर (थीवी), सिया उदय सातार्डेकर (थीवी), दुर्वागुर पद्माकर चव्हाण (फोंडा), कृष्णा काशिनाथ वेंगुर्लेकर (कोलवाळ), मैथिली चव्हाण (फोंडा). बारावी – गौरव डिचोलकर, सावरी मोरजकर, सर्वदा मोरजकर (मुरगांव), मैथिली चव्हाण (फोंडा). बीए- नील नारायण डिचोलकर. तसेच गणित व विज्ञान विषयासाठी कु. मैथिली चव्हाण (फोंडा) हिला स्मितेश सिताराम तळावडेकर यांनी आपली आजी कै. चंद्रभागा यशवंत तळावडेकर यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्ती प्रदान केली.

Related Stories

दीड हजार गोमंतकीय मुरगाव बंदरात दाखल

Omkar B

कुडचडेत आणखी 8 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी

Amit Kulkarni

नोकरभरती घोटाळय़ाची सीबीआय चौकशी करा

Amit Kulkarni

भाजपला दहापेक्षा अधिक जागा नाही

Amit Kulkarni

यापुढे विनाअनुभव सरकारी नोकरी नाही

Patil_p

दुमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्पातील पाण्यामुळे आगोंद नदी प्रदूषित

Amit Kulkarni