Tarun Bharat

झोमॅटोला आणखी एक मोठा झटका

सह-संस्थापक अन् सीटीओ गुंजन पाटीदारांचा राजीनामा

वृत्तसंस्था  / मुंबई

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) गुंजन पाटीदार यांनी सोमवारी कंपनीतील पदांचा राजीनामा दिला आहे. मागील काही काळापासून कंपनीचे वरिष्ठ स्तरीय अधिकारी सातत्याने राजीनामा देत आहेत. या यादीत आता गुंजन पाटीदार यांचेही नाव सामील झाले आहे.

कंपनीसाठी कोर टेक सिस्टीम तयार करणाऱया पहिल्या काही कर्मचाऱयांमध्ये पाटीदार यांचा समावेश होता. पाटीदार यांनी 14 वर्षांपर्यंत कंपनीसाठी काम केले होते. पाटीदार हे आयआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत, झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल हे देखील आयआयटी दिल्लीत शिकलेले आहेत.

पाटीदा यांच्यापूर्वी कंपनीचे आणखी एक सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. मोहित यांच्यापूर्वी झोमॅटोचे न्यू इनीशिएटिव्ह प्रमुख आणि फूड डिलिव्हरी विभागाचे प्रमुख राहुल गांजू तसेच इंटरसिटी लीजेड सर्व्हिसेसचे प्रमुख सिद्धार्थ झवार यांनी कंपनीला रामराम ठोकला होता.

Related Stories

हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 1083 वर

Tousif Mujawar

कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱयांची कर्जे माफ करण्याचा विचार

Patil_p

देशात 20,021 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

अहमदाबादमध्ये लिफ्ट कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

Archana Banage

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात; 13 जण जागीच ठार, 4 जखमी

Tousif Mujawar

‘मोचा’ वादळ बांग्लादेश-म्यानमार किनारपट्टीकडे जाणार

datta jadhav
error: Content is protected !!