Tarun Bharat

शर्यतीच्या आणखी एका बैलाचा मृत्यू

‘लम्पिस्कीन’ने मुतग्यात दोन तर पूर्व भागामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या 30 वर : भरपाईसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन

वार्ताहर /सांबरा

तालुक्मयाच्या पूर्व भागांमध्ये लम्पिस्कीन आजाराने जनावरे मृत्युमुखी पडण्याचा प्रकार सुरूच असून अवघ्या सहा दिवसात मुतगा येथील शर्यतीचा दुसरा बैल मृत्युमुखी पडला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून पूर्वभागामध्ये लम्पिस्कीन आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची संख्या आता 30 वर पोहोचली आहे.

सहा दिवसांपूर्वीच मुतगे येथील शेतकरी शिवाजी कणबरकर यांच्या शर्यतीच्या बैलाचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता येथील शेतकरी संजय चौगुले व गजानन चौगुले यांचा शर्यतीचा ‘शिद्धय़ा’ हा बैल सोमवारी मृत्युमुखी पडला आहे. चौगुले कुटुंबीयांनी चार वर्षांपूर्वी हारुगेरी येथून दीड लाखाला या शर्यतीच्या बैलाला आणले होते व त्याची योग्य देखभाल करून त्याला शर्यतीसाठी तयार केले होते. त्याने मुधोळ, अळणावर, हल्याळ, गोकाक, अंकलगी, चिकोडी, पाच्छापूर, कडोली, मुतगा, बेळगुंदी, कल्लेहोळ आदी गावातील पन्नासहून अधिक शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक पटकावत शर्यती गाजविल्या.

सिद्धय़ाला सात लाखांची बोली

श्रावण महिन्यामध्ये पाच्छापूर येथे झालेल्या शर्यतीमध्ये सिद्धय़ाला सात लाखांची बोली लावण्यात आली होती. मात्र चौगुले कुटुंबीयांनी त्याला देण्यास नकार दिला होता. पंधरा दिवसापूर्वी सदर बैलाला लम्पिस्कीनची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचारही सुरू होते. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने सोमवारी या बैलाचा मृत्यू झाला. सजवलेल्या ट्रक्टरमधून मिरवणुकीने अंत्ययात्रा काढून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निवेदनाद्वारे नुकसानभरपाई देण्याची मागणी

मुतगा येथे शर्यतीच्या दोन बैलांसह अनेक बैल व गाईंचा लम्पिस्कीन या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांना मोठय़ा प्रमाणावर नुकसान सोसावे लागत आहे. यासाठी शासनाने तातडीने पंचनामा करून संबंधित शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.

  ता. पं. माजी सदस्य सुनील अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्ष किरण पाटील, ग्रा. पं. सदस्य सुधीर पाटील, भालचंद्र पाटील, प्रभाकर पाटीलसह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

जमखंडीत उद्यापासून दुपारनंतर सर्व व्यवहार बंद

Patil_p

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

Amit Kulkarni

ओलमणी उच्च प्राथ.शाळेच्या दोन खोल्या बांधकामाचा शुभारंभ

Omkar B

बेळगाव-सूरत हवाईप्रवास नोव्हेंबरपासून

Patil_p

अक्कतंगेरहाळ हे गाव ग्रा.पं.मध्येच ठेवा

Patil_p

बस्तवाड येथे तलाव फुटून वसती योजनेतील घरांना फटका

Patil_p