बेळगाव ; अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट शनिवारी रात्री उघडले नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. बऱ्याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर रेल्वेगेट उघडले नसल्याने अखेर गेटमनला बाहेर येवून ते हाताने वर करावे लागले. असे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे रेल्वेगेटच्या दुऊस्तीची मागणी केली जात आहे. शनिवारी रात्री बेळगाव-बेंगळूर एक्स्प्रेस गेल्यानंतर रेल्वेगेट उघडण्याचा प्रयत्न झाला. एका बाजूचे गेट उघडले परंतु दुसऱ्या बाजूचे गेट न उघडल्याने वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागली. गेटमनकडून गेट वर घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु काही केल्या गेट उघडत नसल्यामुळे अखेर दुचाकीचालकांनी वाहने मागे घेत दुसऱ्या बाजूने जाणे पसंत केले. चौथे रेल्वेगेट येथे वरचेवर असे प्रकार घडत आहेत. शहापूर, वडगाव, येळ्ळूर परिसरातील कामगारांची उद्यमबाग, मजगाव, मच्छे येथील औद्योगिक वसाहतीत ये-जा असते. त्यावेळी जर असा प्रकार घडला तर रेल्वेगेटमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेगेट दुऊस्तीची मागणी केली जात आहे.
Previous Articleअशास्त्राrय गतिरोधकाने घेतला तरुणाचा बळी
Next Article जाहिरात फलकांच्या कारवाईला कंत्राटदारांचा आक्षेप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.