संचालक राजेशकुमार मौर्य यांच्याकडून नव्या स्टेशनचा आढावा
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावरून विमानांच्या फेऱया वाढल्या असल्यामुळे आणखी एक इंधन स्टेशनची आवश्यकता भासत होती. इंडियन ऑईल कंपनीने दुसरे फ्युअल स्टेशन उभारले असून यामुळे विमानांमध्ये वेळेत इंधन भरणे सोयीचे होणार आहे. नव्या स्टेशनचा आढावा संचालक राजेशकुमार मौर्य यांनी घेतला.
प्रवासी संख्या वाढत असल्याने नव्या शहरांना विमानफेऱया वाढत आहेत. त्यात दिल्ली येथून बोईंग विमान दाखल होत असल्याने विमानतळावर आणखी एक फ्युअल स्टेशनची गरज भासत होती. नाईट पार्किंगची व्यवस्था असल्याने काही एअर क्राफ्ट विमानतळावर पार्किंग केली जातात, त्यांना इंधनाची गरज भासत असल्याने इंडियन ऑईल कंपनीने एक नवीन इंधन स्टेशन उभारले. यामुळे भविष्यात जरी विमानांची संख्या वाढली तरी इंधन वेळेत मिळू शकते.