Tarun Bharat

तामिळनाडूत आणखी एका विद्यार्थिनीचा मृत्यू

Advertisements

2 आठवडय़ांमध्ये अशाप्रकारची चौथी घटना

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूत विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. मंगळवारी रात्री शिवकाशीमध्ये 11 वीत शिकणारी एक विद्यार्थिनी स्वतःच्या घरात मृत आढळून आली आहे. या विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या कारणाबद्दल संशय आहे. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या मृत्यूबद्दल सध्या काहीही सांगण्यास नकार दिला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत काहीच सांगता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मुलीचा मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता. परंतु सुसाइड नोट मिळालेली नाही. या विद्यार्थिनीला तीव्र पोटदुखीची समस्या होती असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले आहे.

तामिळनाडूत मागील 2 आठवडय़ांमध्ये 12 वीत शिकणाऱया तीन आणि आता 11 वीत शिकणाऱया एका मुलीचा मृत्यू झाला आहे. शिवकाशीमध्ये ही घटना कुड्डालोर जिल्ह्य़ात 12 वीची विद्यार्थिनी मृत्य आढळून आल्याच्या काही तासांनी घडली आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

आत्महत्येच्या विचाराच्या दिशेने मुलींना लोटू नये. आव्हानांना न घाबरता त्यांना सामोरे जात यश मिळविण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींनी करावा. विद्यार्थिनींचे लैंगिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करणाऱयांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

Related Stories

निवडणुकांच्या चर्चांना आयुक्तांनी दिला पूर्णविराम!

Archana Banage

बेंगळूरमध्ये वाढदिवस कार्यक्रमात स्फोट

Patil_p

बिहार विधानसभा : राजद-काँग्रेसला जनतेचा कौल

datta jadhav

प.बंगालमध्ये ममता बॅनर्जी अडचणीत

Patil_p

‘एक पीएम, एक कार्यकाळ’ लागू व्हावे

Patil_p

लडाख सीमेवर युद्धाभ्यास

Patil_p
error: Content is protected !!