Another water supply channel in Dodamarg
दोडामार्ग शहरातील काही भागात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. त्याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात येईल हे काम सध्या सुरू असलेली आचार संहिता संपल्यानंतर लगेच हाती घेण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. तसेच शहरात एलइडी स्ट्रीट लाईट पुरविणाऱ्या कंपनीने करारा प्रमाणे स्ट्रीट लाईटस न पुरविल्याने या कंपनीसोबत नगरपंचायचा झालेला करार रद्द करण्यात आला असून आचारसंहिता संपल्यानंतर या स्ट्रीट लाईटशी निगडित नवीन टेंडर प्रक्रिया राबविली जाईल असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.
नगरपंचायत कार्यलयात बोलताना श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, दोडामार्ग शहारातील शिक्षक कॉलनी, धाटवाडी तसेच अन्य काही भागांत अलीकडच्या काळात बंगले, राहती घरे आदींची नव्याने वाढ झाली आहे . त्यातील रहिवाशांनी विहिरी, विंधन विहिरी आदींची सोया स्वतःसाठी केली आहे. मात्र तरीही उन्हाळ्यात या सर्वांना पाण्याची समस्या भेडसावते ते पाहता अशा भागात खास पाईपलाईन टाकून त्यांच्यासाठी उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत राहिली याचे नियोजन करण्यात येत असून आचार संहिता संपल्यानंतर याकामाला सुरूवात होईल तसेच ईईएसएल या कंपनीमार्फत शहरात स्ट्रीट लाईट्स पुरविल्या जाणार होत्या मात्र कंपनीच्या दिरंगाईमुळे कंपनीसोबतचा करार रद्द करून आचार संहिता संपताच नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून स्ट्रीट लाईट्सचाही प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग – वार्ताहर