Tarun Bharat

गुजरात जायंटस्चा दुसरा विजय

वृत्तसंस्था/ लखनौ

दुसऱया लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धेत पार्थिव पटेल आणि थिसारा परेरा यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंटस्ने सोमवारी झालेल्या सामन्यात मणिपाल टायगर्सचा दोन गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेतील गुजरात जायंटस्चा हा दुसरा विजय आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मणिपाल टायगर्सने 20 षटकात 8 बाद 120 धावा जमविल्या. त्यानंतर गुजरात जायंटस्ने 17.2 षटकात 8 बाद 121 धावा जमवित विजय नोंदविला.

मणिपाल टायगर्सच्या डावामध्ये रविकांत शुक्लाने 32, मोहमद कैफने 24 धावा जमविल्या. गुजरात जायंटस्तर्फे तिलकरत्ने दिलशानने 18 धावात 2 तर अशोक दिंडाने 22 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात जायंटस्च्या डावामध्ये पार्थिव पटेलने 17 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 34 धावा फटकाविल्या. इंग्लंडच्या साईडबॉटमच्या एका षटकात पार्थिव पटेलने सलग तीन चौकार ठोकले. त्यानंतर पोफूच्या षटकामध्ये पार्थिवने 1 षटकार आणि 3 चौकार नोंदविले. लंकेचा अष्टपैलू थिसारा परेराने 20 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा जमविल्या. मणिपाल टायगर्सतर्फे हरभजनसिंगने 23 धावात 2 तर पोफूने 26 धावात दोन गडी बाद केले. मुरलीधरनने 10 धावात 2 बळी मिळविले. अवानाने 13 धावात 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक ः मणिपाल टायगर्स 20 षटकात 8 बाद 120 (रविकांत शुक्ला 32, मोहमद कैफ 24, तिलकरत्ने दिलशान 2-18, अशोक दिंडा 2-22), गुजरात टायटन्स 17.2 षटकात 8 बाद 121 (पार्थिव पटेल 34, थिसेरा परेरा 22, मुरलीधरन, अवाना, हरभजन सिंग आणि पोफू प्रत्येकी दोन बळी).

Related Stories

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेतून श्रीकांतची माघार

Patil_p

अजय जयरामला डेन्मार्क स्पर्धा हुकणार?

Patil_p

केकेआरला तो पराभव महागात पडणार?

Patil_p

लखनौमध्ये होणार कसोटी क्रिकेटचे पुनरागमन

Patil_p

स्कॉटिश महिला फुटबॉल स्पर्धेत बालादेवीचा गोल

Patil_p

स्वायटेकला हरवून साबालेन्का अंतिम फेरीत

Patil_p