रत्नागिरीतील आरटीओ रेल्वे पुलाखालच्या दुसऱ्या घटनेने खळबळ
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरानजीकच्या आरटीओ रेल्वे पुलावर तरूणाने ट्रेनपुढे स्वतला झोकून देत तरूणाने आत्महत्या केल्याची सलग दुसरी घटना समोर आली आह़े. राजेंद रवींद्र सावंत (22, ऱा वळके बौद्धवाडी रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांना राजेंद्र याचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आल़ा. शुकवारी टिके येथील तरूणाने याच ठिकाणी आत्महत्या केली असताना सलग दुसऱ्या घटनेने खळबळ उडाली आह़े.
राजेंद्र याच्या मृत्यूपकरणी रत्नागिरी शहर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल़ा. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आल़ा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा रविवारी सकाळी नेहमीपमाणे घरातून बाहेर पडला होत़ा. यानंतर रविवारी दुपारी 12 च्या सुमारास आरटीओ रेल्वेपूल येथील रेल्वे रूळावर मृतदेह पडून असल्याचे रेल्वे पोलिसांकडून शहर पोलिसांना कळविण्यात आल़े. मृताची ओळख पटवण्याचे काम केले असता तो वळके येथील राजेद्र सावंत याचा असल्याचे निष्पन्न झाल़े.
या बाबत राजेंद्र याचे काका शुभानंद माणिक सावंत (ऱा वळके) यांनी शहर पोलिसांत खबर दिल़ी. राजेंद्र याने नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, या बाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े. दरम्यान आरटीओ पुलावर रेल्वेपुढे स्वतला झोकून देत आत्महत्या करण्याची ही सलग दुसरी घटना ठरली आह़े. शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथील प्रणव कृष्णा सनगरे (24) या तरूणानेही आरटीओ पुलावर आत्महत्या केली होत़ी. पणव याने शुकवारी सायंकाळी कोच्चिवली-भावनगर एक्सपेस गाडीसमोर स्वतला झोकून दिल़े रेल्वेच्या धडकेत पणव याचा जागीच मृत्यू झाल़ा कोकण रेल्वेचे ट्रॅकमन यांना सायंकाळी पणव याचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल़ा. प्रणव याचे मे 2022 मध्ये लग्न झाले होत़े लग्नाला केवळ 4 महिनेही झाले असताना आत्महत्येसारखे पाऊल पणव याने का उचलले, हे समजू शकलेले नाह़ी. दोन्ही आत्महत्यांच्या घटनांचा तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आह़े.