Tarun Bharat

25 सप्टेंबरला भाजपविरोधी नेते एकत्र येणार

Advertisements

आयएनएलडीची रॅली : शरद पवार, नितीश कुमार होणार सामील

वृत्तसंस्था /चंदीगड

हरियाणात चौधरी देवीलाल यांची जयंती साजरी करण्यासाठी इंडियन नॅशनल लोकदल 25 सप्टेंबर रोजी फतेहाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन करणार आहे. चौधरी देवीलाल यांच्या जयंतीदिनी भाजपविरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरता आयएनएलडीने विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना या कार्यक्रमात सामील करण्याचे नियंत्रण दिले आहे.

25 सप्टेंबर रोजी होणाऱया आयएनएलडीच्या सभेत विरोधी पक्षांचे नेते शरद पवार, नितीश कुमार, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, कनिमोझी सामील होतील. याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनीही हरियाणातील या सभेत सामील होण्याची तयारी दर्शविली आहे. संयुक्त जनता दलाचे नेते. के.सी. त्यागी यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.

सन्मान दिन रॅलीकरता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, शरद यादव, के.सी. त्यागी, सुखबीर सिंह बादल यांच्यासह अनेक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Related Stories

विविध राज्यांमधून 5 दहशतवाद्यांना अटक

Patil_p

पंधरा दिवसात तीन अभिनेत्रींची आत्महत्या

Patil_p

पंजाब काँग्रेसला मोठे भगदाड

Patil_p

तेलंगणा : सफाई कर्मचाऱ्याकडून दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

prashant_c

युक्रेनमध्ये थिएटरवर बॉम्बहल्ला, तब्बल १२०० जण दबल्याची शक्यता

Sumit Tambekar

जाणून घ्या मोदी सरकारच्या ‘या’आठ योजना; फ्लिपकार्ट, अॅमेझॉनही पडले मागे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!