Tarun Bharat

वेंगुर्ले पोलीसांतर्फे शहरात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम

Advertisements

वेंगुर्ले /वार्ताहर-

वेंगुर्ले पोलिस स्टेशनमार्फत पोलिस निरिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अंमली पदार्थ जनजागृती मोहिम राबविण्यात आली. यावेळी स्वतः पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी या मोहिमेबाबत मार्गदर्शन केले.  वेंगुर्ले एस.टी. स्टँड येथे पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वाहतूक पोलिस मनोज परुळेकर, महिला पोलिस संतोषी सावंत यांनी या मोहिमेबाबत प्रवासी, विद्यार्थी व नागरिक यांना तसेच येथील रिक्षा स्टँड येथेही मार्गदर्शन केले. अंमली पदार्थाच्या सेवनाने जीवन उध्वस्त होत आहे. मुलांनी तसेच इतरांनीही त्यापासून दूर रहावे. अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परीणाम पाहता त्याऐवजी योगासनांचा आधार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी केले. यावेळी महिला पोलिस रंजिता चौहान, प्रज्ञा मराठे, मनोज परुळेकर, संतोषी सावंत आदी सहभागी झाले होते.

Related Stories

शिवसेनेची ‘बळीराजा आत्मविश्वास यात्रा’

NIKHIL_N

रॉक गार्डनचे सौंदर्य अधिक खुलणार

NIKHIL_N

ओटवणे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

NIKHIL_N

मनरेगामधून ग्रामीण भागामध्ये पाणंद व खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प

Patil_p

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत रत्नागिरीची सायली साने प्रथम

Patil_p

‘कोविड’ सेंटर चालवताना प्रशासनापुढे समस्यांचा डोंगर

Patil_p
error: Content is protected !!