फोंडा : फोंडा पोलीस स्थानकातर्फे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन विरोधी दिवसानिमित्त निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा शहरात ‘से नो टू ड्रग्ज’ अशा घोषणांबाजीसह जागृती फेरी काढली. वरचा बाजार येथील भवानी सदन येथून प्रारंभ केलेल्या जागृती फेरीचा समारोप क्रांती मैदानावर करण्यात आला. यावेळी फोंडा येथील फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या रवी सिताराम नाईक उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्टी फोंडा येथील दादा वैद्य विद्यालय, जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालय, सरकारी माध्यमिक विद्यालय सदर फोंडा, तसेच कुर्टी फोंडा येथील नॅशनल फॉरेस्निक युनिव्हर्सिटीच्या शिक्षक व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निरीक्षक तुषार लोटलीक म्हणाले अमलीपदाथाच्या सेवनाने शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात. विद्यार्थ्यांनी अमलीपदार्थाच्या सेवनापासून दूर राहून या लढयात सहभागी व्हावे असे आवाहन केले. निरीक्षक लोटलीकर यांनी बावटा दाखवून जागृती फेरीला प्रारंभ केला. यावेळी फोंडा वाहतूक खात्याचे पोलीस कर्मचारी, निवृत्त पोलीस अधिकारी तसेच हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुमारे 200 विद्यार्थी, तसेच 50 शिक्षकांनी सहभाग घेतला.
Previous Articleरस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त
Next Article साखर कारखान्याला अधिक विलंबाविना ‘संजीवनी’ची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.