Tarun Bharat

इराणमधील 80 शहरात हिजाबविरोधी आंदोलन

Advertisements

तेहरान / वृत्तसंस्था

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनाने आता तीव्र स्वरुप धारण केले आहे. हे आंदोलन आता 80 शहरांमध्ये पसरले असून त्याला महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरत असून त्यांनी हिजाब सक्तीचा विरोध चालविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक महिलांना ताब्यात घेतले असले तरी आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही. प्रतिदिन नवनव्या शहरांमध्ये ते पसरत असून अनेक महिलांनी हिजाब वापरणे सोडून दिले आहे.

हिजाब न वापरल्याबद्दल महसा अमीनी या तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. तिला पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली असा दावा सरकारकडून करण्यात आला. तथापि, तिच्या मृतदेहावरील खुणांमुळे तिचा अमानुष छळ पोलिस कोठडीत झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मृत्यूला व्यापक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाली.

यामुळे इराणमध्ये प्रथम राजधानी तेहरान आणि नंतर अन्यत्र जनक्षोभ उसळला. हजारोंच्या संख्येने महिलांनी रस्त्यावर उतरुन हिजाबच्या सक्तीला विरोध सुरु केला. आता सलग 8 दिवस हे आंदोलन सुरु असून त्याने इराणच्या प्रशासनाची काळजी वाढविली आहे. सरकारने काहीतरी तोडगा काढून आंदोलकांना शांत करावे, अशी मागणी सर्वसामान्य लोकांकडूनही होऊ लागली आहे. महिलांच्या या आंदोलनाला इराणमधीला पुरुषांचेही मोठय़ा प्रमाणात समर्थन मिळत आहे.

26 महिलांचा मृत्यू

पोलिसांविरोधात झालेल्या झटापटीत इराणमध्ये आतापर्यंत 26 आंदोलनकर्त्या महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती इराण टीव्हीवरुन देण्यात आली आहे. असंख्य महिला रस्त्यावर हिजाबचे दहन करताना दिसून येत आहेत. पोलिसांचा विरोध आणि गोळीबार यांना न जुमानता, हे आंदोलन सुरु असून त्याची व्याप्ती आणि तीव्रता लपविण्याचा इराण प्रशासनाचा प्रयत्नही तोकडा पडताना दिसत आहे.

Related Stories

फ्रान्सच्या पंतप्रधानपदी जीन कॅस्टेक्‍स

datta jadhav

वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलरचा निधी

prashant_c

इम्रान खान यांच्यावर दीड तास शस्त्रक्रिया

Patil_p

सकाळ-संध्याकाळ रंग बदलणारा पर्वत

Patil_p

श्रीलंकन सरकारविरोधात जनता रस्त्यावर

Patil_p

युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक अस्त्रांची निर्मिती?

Patil_p
error: Content is protected !!