Tarun Bharat

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन तीव्र

Advertisements

सत्तापालट होण्याची शक्यता ः वरिष्ठ सैन्याधिकाऱयांनी कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविले

वृत्तसंस्था / तेहरान

इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने आता 35 हून अधिक शहरांमध्ये फैलावली आहेत. या पार्श्वभूमीवर आता सत्तापालट होण्याची भीती वाढली असून इराणचे सैन्य रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या टॉप कमांडर्सनी स्वतःच्या कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तेहरानमध्ये एका ऑईल कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये या कुटुंबांना पूर्णवेळ सुरक्षा पुरविण्यात येत आहे.

निदर्शने सुरूच राहिली किंवा सत्तापालट झाला तर सुरक्षितपणे शेजारी देशात पाठविण्याचे आश्वासन सैन्याधिकाऱयांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रपती रहीसी यांच्या सरकारने हिजाबविरोधी निदर्शकांवर बळाचा वापर सुरूच ठेवला आहे. यामुळे मृतांची संख्या वाढून 80 वर तर जखमींची संख्या 500 वर पोहोचली आहे. सुमारे 2 हजार जणांना अटक करण्यात आली आहे. इराणच्या मॉरल पोलिसांच्या कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या महाशा अमिनीच्या समर्थनार्थ देशांमध्ये निदर्शने सुरू आहेत.

मागील दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे पोलीस विभागाचे मनोबल खालावले आहे. सुटी मिळत नसल्याने पोलीस कर्मचारी थकले आहेत. निदर्शकांवर नियंत्रण मिळविणे अवघड ठरल्याचे इराणचे मुख्य न्यायाधीश मोहसेनी ऐजी यांनी मान्य केले आहे. इराणच्या सत्ताक्रमात सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी आणि राष्ट्रपती इब्राहिम रहीसी यांच्यानंतर मुख्य न्यायाधीश मोहसेनी ऐजी हे तिसऱया क्रमांकावर आहेत.

कुख्यात तुरुंगात कैद

हिजाबविरोधी निदर्शकांना तेहरानमधील कुख्यात करचक तुरुंगात कैद करण्यात आले आहे. फोटोजर्नलिस्ट (छायावृत्तकार) यल्दा मोदारी यांनी एक ध्वनिफित जारी करत तुरुंगात निदर्शकांना अन्नपाणी मिळत नसल्याचे सांगितले आहे. तुरुंगात आमची हत्या होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. करचक तुरुंगात इस्लामिक सरकारच्या विरोधकांना कैद करण्यात येते. या तुरुंगात दरवर्षी 55 जणांना फासावर लटकविण्यात येत असते.

Related Stories

सदैव घरातून काम करण्याची अनुमती

Patil_p

ननकानासाहिब घटनेचा गुरुद्वारा समिती घेणार आढावा

Patil_p

चीनकडून ‘द झियुआन 3′ या मॅपिंग सॅटेलाईटचे प्रक्षेपण

datta jadhav

अजबच!, सहारा वाळवंटच गोठले

Patil_p

26 तज्ञांचे पथक पुन्हा करणार चीनमध्ये तपास

Patil_p

डॅनियल पर्ल यांचा मारेकरी विश्रांतीगृहात

Patil_p
error: Content is protected !!