नवी दिल्ली
बजाज इलेक्ट्रिकल्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) अनुज पोद्दार यांना बढती मिळाली आहे. ते ही जबाबदारी आता यापुढे अंगावर घेतील. याआधी ते कंपनीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. शेखर बजाज हे कंपनीचे कार्यकारी चेअरमन म्हणून कायम राहणार आहेत. अशा पद्धतीने यापुढे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक ही दोन्ही पदे वेगवेगळी असणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून कंपनी विविध प्रकारचे निर्णय घेताना दिसते आहे. यामध्ये नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. यावेळी बोलताना नवे सीईओ अनुज पोद्दार यांनी, आपल्याला निवडीबद्दल खूप आनंद झालेला आहे.