तिग्मांशु धूलिया यांचे दिग्दर्शन
‘घरवापसी’, ‘थार’ आणि ‘क्रॅशकोर्स’ यासारख्या चित्रपटांद्वारे स्वतःची ओळख निर्माळा करणारी अनुष्का आता ‘गर्मी’ या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. तिग्मांशु धूलिया यांच्या दिग्दर्शनात ही वेबसीरिज तयार होत आहे. धूलिया यांची ही वेबसीरिज असल्याने चाहते त्याची मोठय़ा आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
तिग्मांशु धूलिया यांच्याकडे दिग्दर्शनाचे अजब कौशल्य आहे. एक कलाकार म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव बरेच काही शिकविणारा होता. तिग्मांशू हे अन्य दिग्दर्शकांपेक्षा खूपच वेगळे आहेत, ते कलाकारांना त्यांची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात, असे उद्गार अनुष्काने काढले आहेत.
विद्यार्थीदशेतील राजकारणावर आधारित ‘गर्मी’ वेबसीरिजमध्ये मुकेश तिवारी, विनीत कुमार आणि जतीन गोस्वामी हे मुख्य भूमिकेत आहेत. या वेबसीरिजमधून अनुष्काला बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहात स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी मिळाली आहे. अनुष्का याचबरोबर अन्य काही चित्रपटांमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.