Anushka Sharma: अनुष्का आणि विराटच्या जोडीची चर्चा सोशल मिडियावर नेहमीच रंगते. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी काहीतरी खास पोस्ट करत असतात. अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये आहे. यावेळी तिला विराटची खूप आठवण येत आहे. तिनं सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट केलीय. जग अधिक उजळ, मनोरंजक आणि मजेदार दिसत जेव्हा तुम्ही एका खास व्यक्तीसह हॉटेल बायो-बबलमध्ये असतात”,मिसिंग हबी असा आशयाची पोस्ट तिने सोशल मिडियावर शेअर केली आहे.
अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये आहे. तर, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतात आहे. नुकतीच अनुष्का शर्माने विराट कोहलीसाठी एक पोस्ट केलीय. अनुष्कानं इन्स्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये “जग अधिक उजळ, मनोरंजक आणि मजेदार दिसत जेव्हा तुम्ही एका खास व्यक्तीसह हॉटेल बायो-बबलमध्ये असतात”, असं लिहिलंय.
चकदा एक्सप्रेस चित्रपटाची चाहत्यांमध्ये उस्तुकता
भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित चकदा एक्सप्रेस या चित्रपटांची सर्वांनाच उस्तुकता लागलीय. या चित्रपटात अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.


previous post