बेळगाव/ प्रतिनिधी
महाद्वार रोड येथील साळुंके बिल्डिंगमधील ‘अणवेकर ज्युवेलर्स’ लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. वर्षपूर्तीनिमित्त अणवेकर ज्युवेलर्सने आपल्याकडे दागिने खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी विशेष सुविधा जाहीर केली आहे. प्रति ग्रॅम सोन्यासाठी केवळ 400 रुपये मेकिंग चार्ज आकारते. ग्राहकांसाठी कल्पतरू योजनाही सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 12 महिने हप्त्याने भरणा केलेल्या रकमेबद्दल संबंधित ग्राहकांकडून मेकिंग चार्ज न घेता किंवा वेस्टेज न आकारता दागिने देण्यात येतात. सरकारी कर्मचाऱयांना अणवेकर गोल्ड फायनान्सकडून कर्ज सुविधा मिळते. पैशाची चणचण भासणाऱयांना त्यांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांवरील एकूण किमतीवर 1 टक्का व्याज दराने अणवेकर गोल्ड फायनान्सकडून कर्ज देण्यात येते. दर्जेदार व विनम्र सेवेमुळे अणवेकर ज्युवेलर्सचे नाव सर्वदूर झाले आहे. सुमारे एक लाख ग्राहक सध्या अणवेकर ज्युवेलर्सशी व्यवहार करीत आहेत. अणवेकर ज्युवेलर्सने यावषीही ग्राहकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. चांदीच्या दागिन्यातही हॉलमार्कचा दर्जा राखल्याने दागिने जडणघडण, विक्री क्षेत्रात बेळगाव शहर, बेळगाव जिल्हा व गोव्यासह परप्रांतीय ग्राहकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. विवाह आदी समारंभांसाठी दागिने खरेदीसाठी येथे ग्राहकांची गर्दी होत असते. ग्राहकांच्या सोयीसाठी दुकान सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत खुले ठेवण्यात येत आहे. विवाह समारंभासाठी लागणारे दागिने उदा. श्रीमंत नेकलेस, राणी हार, कोल्हापूर हार, बोंदेळ पोतहार, पाटली, बाजुबंद, मंगळसूत्र, नथनी, कर्णफुले, अंगठी या प्रकारचे दागिने, चांदीचे दागिने, चांदीतून बनविलेले पूजेचे साहित्य, चांदीची भांडी येथे उपलब्ध होतात.
अणवेकर गोल्डचे मालक मंजुनाथ अणवेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करीत आपला व्यवसाय जोमाने चालविला आहे. आपल्या व्यवसायात पत्नी मेघा यांचे बहुमोल सहकार्य मिळते, हे सांगण्यास मंजुनाथ विसरत नाहीत.