Tarun Bharat

ऍपलकडून महिन्यात भारतातून 1 अब्ज डॉलर्सच्या फोन्सची निर्यात

डिसेंबरमधील कंपनीची कामगिरी ः  पहिली कंपनी ठरल्याचा दावा

नवी दिल्ली

 आयफोन निर्माती दिग्गज कंपनी ही एकाच महिन्यात 1 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन्सची भारतातून निर्यात करणारी पहिली कंपनी बनली आहे.

डिसेंबरमध्ये ऍपल कंपनीने भारतातून तयार केलेल्या स्मार्टफोन्सची विक्रमी स्तरावर निर्यात केली आहे. कंपनीने डिसेंबरमध्ये अंदाजे 8100 कोटी रुपयांचे स्मार्टफोन्स निर्यात केले आहेत. निर्यातीत आघाडीवर सॅमसंग राहिली आहे. यापाठोपाठ आता ऍपलचा नंबर लागतो. पण याआधी नोव्हेंबरमध्ये निर्यातीत ऍपलने आघाडीचे स्थान राखले होते.

कोठे होते निर्मिती

ऍपल ही दिग्गज कंपनी सध्याला भारतात आयफोन 12, 13, 14 आणि 14 प्लसै या फोन्सची निर्मिती करते. फॉक्सकॉन, विस्ट्रॉन व पेगाट्रॉन या कंत्राटी निर्मात्यांकडून फोन्सची भारतातच दक्षिण राज्यांमध्ये निर्मिती होत आहे. यापैकी पेगाट्रॉन व फॉक्सकॉन यांचे कारखाने तामिळनाडू या राज्यात आहेत तर अन्य एक विस्ट्रॉनचा कारखाना मात्र कर्नाटक राज्यात आहे. यांना सरकारच्या पीएलआय (उत्पादन प्रोत्साहन सवलत) योजनेचा लाभ होतो आहे.

Related Stories

रियलमी नारजो 50 आय प्राईम बाजारात

Patil_p

शाओमीचा एक्स सिरीजचा फोन 23 एप्रिलला

Amit Kulkarni

Twitter: ट्विटरचं आणखी एक नवं फीचर; कसे वापरावे जाणून घ्या सविस्तर

Archana Banage

गुगलचा अफोर्डेबल फोन पिक्सल 4 ए सादर

Patil_p

गॅलक्सी एस-21 सिरीजच्या स्मार्टफोन्सचे आगमन

Patil_p

डेलला भारतात मिळतेय वाढती पसंती

Amit Kulkarni