भारतासह 60 देशात उपलब्ध : 14 मार्चपासून खरेदी करता येणार


नवी दिल्ली : प्रसिद्ध आयफोन निर्माती कंपनी अॅपल यांनी आपल्या बहुप्रतिक्षित आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस 5जी या स्मार्टफोन्सना बाजारात दाखल केले आहे. सदरचा फोन हा पिवळ्या रंगामध्ये दाखल केल्याची माहिती आहे. 10 मार्चपासून सदरचा नवा फोन ग्राहकांना खरेदी करण्यासाठी बूक करता येणार आहे. भारतासह सुमारे 60 देशांमध्ये हा फोन खरेदीकरता उपलब्ध होणार आहे. मोबाईल स्टोअरसह ऑनलाईन पोर्टलवर 14 मार्चपासून आयफोन 14 व 14 प्लस स्मार्टफोन्स खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
किती असेल किमत?
आयफोन 14 ची भारतामध्ये किंमत 79,900 रुपये इतकी राहणार असून आयफोन 14 प्लसची किंमत 89,900 रुपये इतकी असणार असल्याची माहिती मिळते आहे. 128 जीबी स्टोअरेजच्या सोयीसह हे दोन्ही फोन येणार आहेत. आयफोन 14 ला 6.1 इंचाची ओएलईडी स्क्रीन असणार असून 12 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. तर आयफोन 14 प्लसची स्क्रीन 6.7 इंचाची असणार आहे.
वैशिष्ट्यो….
- रंग- मिडनाइट, पर्पल, स्टारलाइट, ब्ल्यू, रेड, यलोव्ह
- वजन- एकाच 172 ग्रॅम तर एकाचे 203 ग्रॅम
- चिप- ए 15 बायोनिक चिप
- पॅमेरा- ड्युअल 12 मेगापिक्सल
- ऑपरेटिंग सिस्टम- आयओएस 16