Tarun Bharat

रेईस मागूस जिल्हा पंचायतीसाठी आरजीतर्फे साईनाथ कोरगांवकर यांचा अर्ज दाखल

Advertisements

प्रतिनिधी/ म्हापसा

रेईस मागूस जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरजीतर्फे साईनाथ कोरगांवकर यांनी आपला अर्ज बार्देश तालुका मामलेदारांकडे आज सादर केला असल्याची माहिती आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी बार्देश मामलेदार कचेरीबाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्याला आम्ही तरुण वर्ग दिला

ते म्हणाले, गोव्याला एक त्यांच्याबरोबरचा तरुण उमेदवार पाहिजे होता तो आम्ही लोकांसमोर ठेवला आहे. भरपूर गोमंतकीय जे आम्हाला राहिले आहे ते आम्हाला मत देणार आहे. निशाणी अद्याप आम्हाला मिळाली नाही. आमचे दवर्ली, कुठ्ठाळी व येथे तीन ठिकाणी उमेदवार आहेत. त्यांना जे काही सहकार्य पाहिजे ते आरजी देणार आहे अशी माहिती मनोज परब यांनी दिली. आज प्रश्न भरपूर आहे. परप्रांतीय भरलेले आहे. रेईस मागूस मध्ये बिल्डर्स लोबी येत आहे. तेथे घरे अद्याप नावावर झाली नाही. 300 वर्षापूर्वी ते तसेच आहे. रामनगर मोठी झोपडपट्टी आहे. जिल्हापंचायत सदस्य अद्याप लोकांच्या घरी यापूर्वी पोचलेला नाही. जनतेला काय हवे आहे याचा विचार अद्याप यापूर्वीच्या प्रतिनिधींनी केला नाही. लोकांच्या समस्या सोडविण्यास आम्ही पुढे राहणार आहोत असे ते म्हणाले.

कायदा सुव्यवस्था बिघडण्यास मुख्यमंत्री जबाबदार

राज्यात कायदा सुव्यवस्था आज ढासाळली आहे याचे कारण म्हणजे आमचे गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत याबाबत गंभीर नाही. ते फक्त आज दुसऱया पक्षातील आमदार फोडण्यात मग्न आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण तयार नाही. आज राज्यात बंदलादेशी सापडू लागले आहेत. इतकेच नव्हे तर ते कळंगूट सारख्या ठिकाणी आपला धंदा बसवू लागले आहे. राज्यात आज रामभरोसे चालले आहे. युपी बिहार राज्य राज्यात आले आहे. आज त्यांची परंपरा गोव्यात होत चालली आहे. बलात्कार, खंडणी वसूली, खुनी हल्ले आदी वाढत चालले आहे. पूर्वी एक खून झाला तर राज्यभर चालत होते. अपहरण, मुली बेपत्ता, विनयभंग प्रकरणे वाढत आहेत. याला जबाबदार हा सरकार आहे. कारण मतदानासाठी वोट बँक हा सरकार सांभाळत आहे. लोकांना वोटींग कार्ड देत आहे व राज्याची वाट लागत चालली आहे. गेली पाच वर्षे आम्ही हेच सांगत आलो आहोत डीजीपींना आम्ही हेच सांगतले आहे. आम्ही याबाबत आवाज सदैव उठवीच चाललो आहोत असे ते म्हणाले.

आता भाजप विरुद्ध आरजीचा लढा

टीसीपी अंमलबजावणी झाली तेव्हा आमचा आमदार होता. इतर प्रमाणे आमचे आमदारही त्यात सहभागी होऊन आपले जीवन सुखाने जगले असते मात्र आमदार बोरकर यांनी तसे केले नाही. आम्ही विरोधकांची नव्हे तर गोंयकारांचो आवाज विधानसभेत पोचण्यासाठी काम करीत आहे. कोण आम्हाला बी टीम म्हणते यात काही सत्य नाही. आम्ही आज लढत आहे ती आरजी विरुद्ध थेट भाजप आहे. कारण आज विरोधक कोण राहिले नाही असे मनोज परब म्हणाले. फक्त दोनच पक्ष राज्यात राहणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. 

कोलवाळ भागातील स्क्रेप अड्डे जमिनदोस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही

कोलवाळ बांदेकर पेट्रोलपंप आहेत त्याच्यामागे कित्येक वर्षे येथे बेकायदेशीर भंगारअड्डे बेकायदेशीर उभे आहेत. तेथे कोण राहतात, काय धंदे चालतात हे कुणालाच माहीत नाही. याबाबत आमदार विरेश बोरकर यांनी पालिकेत तक्रार केली. टीसीपी, पोल्यूशन बोर्डकडे तक्रार केल्या. गोठणी व्हाळ येथे पाण्याचे नमुनेही घेतले. स्क्रेप यार्डचे मालक आहे त्यांनी बळजबरीने कोमुनिदादची जागा बळकावली आहे व त्या ठिकाणी भंगार अड्डे उभारले आहेत. 18 ऑक्टोबरला याबाबत न्यायालयात सुनावणी आहे. त्यांना पंधरा दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाही. आरोग्य खात्याच्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. त्यांनापरवानगी वा कागदपत्रे नाही. याबाबत महम्मद उम्मद अली, हमूद भिसा, खलीद महम्मद, महम्मद साहीद या चौघांना नोटीस आली आहे. आरजी म्हणून आम्ही हा विषय शेवटपर्यंत नेऊन हे जमिनदोस्त करणार आहे. आज अनेक प्रकरणे जमिनदोस्तची राखीव आहे. येथे तक्रारदार आमदार आहे यावर कारवी होणार असे वाटते. यापूर्वीही आमदारांनी तक्रार करून काही केले नाही. आम्हालाही ऑफर आल्या मात्र आम्ही सेटींग करीत नाही. भोमाही यापूर्वी आम्ही आवाज उठविला आहे. आम्ही जमिनदोस्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही.

उमेदवार साईनाथ कोरगांवकर म्हणाले, गेली सहा वर्षे जनतेसाठी आम्ही खूप कामे केली आहेत. आता लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक संधी मिळाली आहे. झेडपी वर्षातून एकदा या भागात दिसत होते ती प्रथा बंद करून जनतेच्या सेवेस सदैव आम्ही तत्पर राहणार आहोत असे साईनाथ कोरगांवकर म्हणाले.

Related Stories

सोलापूर : चार रुग्ण पॉझिटिव्ह

Archana Banage

नैऋत्य रेल्वे: लोकमान्य टिळक – हुबळी स्पेशल एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

Archana Banage

शहरात अक्षयतृतीया-रमजान उत्साहात साजरा

Patil_p

सांगली : खोजनवाडी येथे शेततळ्यात बुडून युवतीचा मृत्यू

Archana Banage

बेंगळूरमध्ये राज्यातील पहिला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण

tarunbharat

गोदरेजच्या सीईओपदी निसाबा गोदरेज

Patil_p
error: Content is protected !!