Tarun Bharat

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी पीएलआय योजनेअंतर्गत 32 कंपन्यांचे अर्ज मंजूर

Advertisements

निती आयोगाकडून अर्जांवर शिक्कामोर्तब : अन्य अर्जांवरही लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील अधिकार प्राप्त समितीने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रासाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह  योजनेअंतर्गत 32 लाभार्थींना मान्यता दिली.

एका निवेदनात, माहिती देताना आयोगाने म्हटले आहे की, परमेश्वरन अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मोठय़ा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कंपन्यांसाठी पीएलआय योजनेंतर्गत मोबाइल उत्पादनास प्रोत्साहन देण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.  यांच्या अंतर्गत आता 10 कंपन्यांना मोबाईल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. पीएलआय योजनेंतर्गत मोबाईल उत्पादन युनिटची देखील निवड करण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती आहे. 

या योजनेअंतर्गत डिक्सन टेक्नॉलॉजीजची उपकंपनी असलेल्या पेजेट इलेक्ट्रॉनिक्सला 53.28 कोटी रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पेजेट इलेक्ट्रॉनिक्सचे नोएडा, उत्तर प्रदेश येथे उत्पादन युनिट आहेत. जून तिमाहीसाठी, या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱया कंपन्यांनी 1,67,770 कोटी रुपयांची विक्री केली होती, ज्यामध्ये 65,240 कोटी रुपयांची निर्यातीचा समावेश  आहे. 

 निती आयोगाने सांगितले की, पीएलआय योजनेअंतर्गत 28,636 लोकांना रोजगार मिळाला आहे. या प्रोत्साहन योजनेसाठी इतर लाभार्थ्यांचे अर्जही लवकरच विचारात घेतले जाणार असल्याची माहिती असून यामध्ये 10,69,432 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पादन आणि सात लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याचा दावा निती आयोगाने यावेळी केला आहे.

पाच देशी कंपन्यांचा समावेश

मोठय़ा प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन युनिटसाठी चालवल्या जाणाऱया पीएलआय योजनेंतर्गत 32 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 10 कंपन्या मोबाईल उत्पादनाशी संबंधित आहेत. मोबाईल उत्पादक कंपन्यांमध्ये पाच देशी आणि पाच विदेशी कंपन्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

देशांतर्गत उत्पादनास स्पर्धात्मक बनविणार

सरकारने अर्थव्यवस्थेच्या 14 क्षेत्रांसाठी सुमारे दोन लाख कोटी रुपयांच्या वाटपासह पीएलआय योजना सुरू केली होती. या क्षेत्रांमध्ये ऑटोमोबाईल्स, ऑटो ऍक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फार्मा, कापड, प्रगत रासायनिक पेशी आणि विशेष स्टील यांचा समावेश आहे. पीएलआय योजनेचा उद्देश देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे आहे.

Related Stories

इलेक्ट्रीक हायवेचे काम सुरू

Patil_p

पर्सनल लोनच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

अस्थिरतेचे सावट; पण…

Patil_p

‘विस्तारा’ची भारत-जर्मनी उड्डाणे सुरु

Patil_p

डिजिटल पेमेंटमध्ये भक्कम वाढीची शक्यता

Patil_p

‘इपीएफओ’सोबत जोडले 17 लाख सदस्य

Patil_p
error: Content is protected !!