► हैदराबाद
वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार मल्लू रवि यांना नवी दिल्लीत तेलंगणा सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. वाय.एस. राजशेखर रेड्डी हे अविभाजित आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असताना मल्लू रवि हे याच पदावर होते. याचदरम्यान राज्य सरकारने काँग्रेस नेते वेम नरेंद्र रेड्डी , मोहम्मद अली शब्बीर, हरकारा वेणुगोपाल राव यांनाही सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांचे सल्लागार म्हणून वेम नरेंद्र रेड्डी काम पाहणार आहेत.