नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील गुलाम अली यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती केली. यासंबंधीची अधिसूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. जम्मू-काश्मीरमधील गुर्जर मुस्लीम समाजातील व्यक्तीला नामनिर्देशित सदस्य म्हणून वरि÷ सभागृहात पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यापूर्वी या समाजाचे संसदेमध्ये फारच कमी प्रतिनिधित्व होते. आपल्या नियुक्तीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाम अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून हा स्वतःचा नसून संपूर्ण जम्मू काश्मीरच्या जनतेचा गौरव असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केले होते. यासह, पूर्वीच्या राज्य दर्जातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यसभेतील रिक्त जागा भरण्यासाठी गुलाम अली यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले.