मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीची नियुक्ती करण्यासाठी नवीन क्रिकेट सल्लागार समिती (CAC) नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. या समितीवर जतीन परांजपे, अशोक मल्होत्रा आणि सुलक्षणा नाईक या सदस्यांचा समावेश आहे.
अशोक मल्होत्रा (Ashok malhotra) यांनी भारतासाठी एकुण ७ कसोटी आणि२० एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्षही होते. तर जतिन परांजपे (Jatin Paranjape) यांनी भारतासाठी ४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते वरिष्ठ पुरूष संघाच्या निवड समितीवरही सदस्य म्हणुन होते.
मुळच्या मुंबईच्या असणाऱ्या सुलक्षणा नाईक (Sulkshana Naik) यांनी आपल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी २ कसोटी, 46 एकदिवसीय आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. 2020 मध्ये त्या आरपी सिंग आणि मदन लाल यांच्यासमवेत CAC समितीच्या सदस्या म्हणून नियुक्त केल्या गेल्या होत्या.


previous post