Tarun Bharat

नियोजन-सांख्यिकी खाते संचालकपदी विजय सक्सेना यांची नियुक्ती

Advertisements

प्रतिनिधी / पणजी

नियोजन आणि सांख्यिकी खात्याच्या संचालकपदी विजय सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे सक्सेना हे या खात्याचे संयुक्त संचालक म्हणून सेवा बजावित आहेत. गोवा सरकारच्या अटल ग्राम योजनेची कार्यवाही आणि योजना राबविण्याची जबाबदारी तेच हाताळीत होते.

विजय सक्सेना हे गोवा लोकसेवा आयोगामार्फत 1993 मध्ये या सेवेसाठी निवडले गेले. यापूर्वी त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या विभागातही काम केलेले आहे. या अगोदर त्यांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागात मुख्य प्रबंधक म्हणूनही सेवा बजावली आहे. 2016 पासून अटल ग्राम योजनेची यशस्वीपणे त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे. या योजनेंतर्गत गोवा सरकारने त्यांची प्रकल्प अधिकारी आणि सदस्य सचिवपदी नियुक्ती केलेली होती.

आधार कार्ड ची यशस्वीपणे गोव्यात अंमलबजावणी करण्यासाठी सक्सेना यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा नंदन निलेकेणी यांनी या पूर्वीच केलेली होती. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत काहीनी या योजनेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गोवा सरकारने सर्वेक्षणाची जबाबदारी सक्सेना यांच्यावर सोपविली होती व त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. त्यातून गोवा सरकारचे बरेच पैसेही वाचले. गोवा सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची सूची करून त्यांचे इंग्रजी, मराठी, कोकणी भाषेत रुपांतर करून त्याच्या प्रति सर्व क्षेत्रात व जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या कामात सक्सेना यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे.

Related Stories

दिवसभरात 2960 कोरोनामुक्त

Amit Kulkarni

राज्यपालांची सरकारला पुन्हा चपराक

Patil_p

विधानसभेतही भाजपलाच बहुमत

Amit Kulkarni

सरकारच अमली पदार्थ व्यवसायात

Omkar B

हुनरहाट व्यापार महोत्सवाचा समारोप

Amit Kulkarni

‘श्री दामबाबा’चा गुलालोत्सव 29 रोजी

Amit Kulkarni
error: Content is protected !!