मुंबई
आरोग्य क्षेत्रातील कंपनी ब्लू चॅट हेल्थकेअरला आयपीओ सादरीकरणासाठी शेअरबाजारातील नियामक सेबीने मंजुरी दिली आहे. आयपीओ सादरीकरणासंदर्भात ब्लू जेटने सेबीकडे गेल्या सप्टेंबरमध्ये रितसर अर्ज केला होता. यासाठीची परवानगी अखेर अलीकडेच सेबीने दिली असल्याने आता आयपीओ सादरीकरणाचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे. औषधी कंपन्या आणि राष्ट्रीय जनरिक औषध फर्मकरिता कंपनी उत्पादने बनवते.