मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात टर्शरी कॅन्सर केअर सेंटरच्या सुमारे 247 कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने एक्स-पोस्ट फॅक्टो मंजुरी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारच्या एचएससीसी (इंडिया) लिमिटेडला देण्यात आले आहे. ’आयटी धोरण 2018’ आणि गोवा ’स्टार्ट-अप धोरण 2021’ मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी देण्यात आली. गोव्यात होणाऱया ’17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धा 2022’ वरही चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.