गणेशोत्सव, दुर्गाउत्सवाच्या नियोजनाचा तयारी : दिव्यांग महोत्सवाच्या जेवणाच्या बिलाचे विषय मंजूर: पालिकेच्या गाड्या दुरुस्तीकरता तजवीज : पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिवाळीत मिळणार
सातारा/प्रतिनिधी
सातारा पालिकेची प्रशासकिय सभा प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत तब्बल 67 विषयावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. त्यात पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिवाळीत देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. तसेच दिव्यांग महोत्सवातले जेवणाचे बिल मंजूर करण्याचे दोन विषय मंजूर करण्यात आले.
या प्रशासकीय सभेला सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. स्थायी समितीच्या हॉल मध्ये ही सभा पार पडली. त्यात लक्ष्मी टेकडी येथील पालिका कर्मचाऱ्यांची चाळ दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 9 लाख 98 हजार 302 रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. सातारा पालिकेच्या कायम आस्थापनेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना 2022-23 यावर्षीचे दिवाळीचे सानुग्रह अनुदान देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. तसेच सोनगाव कचरा डेपोत असलेल्या मैला प्रकल्पात पायाभूत सुविधा करण्यात येणार आहेत. वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे.
घरकुल योजनेच्या कामाचे जीएसटी भरणे, पालिकेच्या मालकीची टिपर, अग्निशमन वाहन आणि आरोग्य विभागाचे वाहन यांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करण्यात आली आहे. खाजगी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच गणेशोत्सव व दुर्गाउत्सव काळात मिरवणूक मार्ग व विसर्जन ठिकाणी लाईट,साउंड, सीसीटीव्हीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागाच्या ताब्यात असलेल्या 40 घंटा गाड्यांचे जीपीएस सुरू करण्यात येणार आहे तसेच गाड्या दुरुस्ती करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीची तरतुद केली आहे. पूनम कॉन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेड सेपरेटरवर एलईडी बसवण्यात येणार आहे, असे सुमारे 67 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.
दिव्यांग महोत्सवाचे जेवणाचे बिलाचे विषय मंजूर
सातारा पालिकेच्यावतीने प्रथमच दिव्यांग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या महोत्सवात जेवणाचे बिल देण्यासाठी या सभेत दोन विषय मंजूर करण्यात आले आहेत.श्री. केटडर्स आणि हॉटेल रामभरोसे यांचे बिल देण्याच्या विषय मंजूर करण्यात आले आहेत. तसेच तिसरा विषय हा ट्रॉफी पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.
कार्यलयीन सहाय्यक भरणार पालिका
वसुली विभागात कार्यलयीन सहाय्यक भरण्यात येणार आहेत तसेच इतर विभागात ही कार्यलयीन सहाय्यक भरण्यात येणार असून तसा विषय मंजूर करण्यात आला आहे. तसेच चतुर्थ वार्षिक पाहणीवेळी पूर्ण पाडलेल्या मिळकतीवर भाडे करार 0.01करण्यात आला आहे. त्यास इतर विषयांना मंजुरी देण्यात आली.