Tarun Bharat

कॉर्बेव्हॅक्सच्या बूस्टर डोसला मंजुरी

Advertisements

कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड घेतलेल्यांनाही तिसरा डोस मिळणे शक्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकारने बुधवारी बायोलॉजिकल-ई कंपनीच्या कॉर्बेव्हॅक्स लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मान्यता दिली. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लाभार्थींना आता बूस्टर डोस म्हणून कॉर्बेव्हॅक्स लस मिळू शकते. यापूर्वी बूस्टर डोससाठी दिलेली लस वगळता इतर लस देशात प्रशासित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रौढांना दुसऱया डोसच्या तारखेपासून 6 महिने किंवा 26 आठवडय़ांनंतरच कॉर्बेव्हॅक्सचा बूस्टर डोस मिळू शकेल.

लसीकरणाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (एनटीएजीआय) आरोग्य मंत्रालयाकडे बूस्टर डोस म्हणून कॉर्बेव्हॅक्सचा वापर करण्याची शिफारस केली होती. भारतातील पहिली स्वदेशी विकसित आरबीडी प्रोटीन सबयुनिट लस कॉर्बेव्हॅक्स सध्या 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी वापरली जात आहे. आता केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेले नागरिकही मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती या लसीचा तिसरा डोस घेऊ शकतात. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 4 जून रोजी 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून कॉर्बेव्हॅक्सला मंजुरी दिली होती.

बूस्टर डोसच्या स्वरुपात सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वात सुधारणा केली जात आहे. बूस्टर म्हणून कॉर्बेव्हॅक्सच्या वापराशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेदेखील कोविन पोर्टलवर बदलली जात आहेत. 10 एप्रिलपासून देशातील 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाचा बूस्टर डोस लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या पहिल्या आणि दुसऱया डोससाठी वापरण्यात आलेली कोविड-19 लस 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांना खबरदारी म्हणून दिली जात आहे. 18-59 वयोगटातील 4.13 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. तर 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांना, आरोग्य कर्मचारी आणि प्रंटलाईन कामगारांना 5.11 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.

Related Stories

‘पोषण’ माध्यान्ह आहार योजनेला कालावधीवाढ

Patil_p

हिमाचलमध्ये 550 वर्षे जुनी ‘ममी’

Amit Kulkarni

माजी केंद्रीयमंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

Patil_p

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये; पंजाब लोक काँग्रेस भाजपमध्ये विलीन

Abhijeet Shinde

दृष्टीहीन हिमानी ज्ञानाचा सागर

Patil_p

अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू

datta jadhav
error: Content is protected !!