प्रभारी खजिनदारांनी अंदाजपत्रकावर सही न केल्याने वातावरण तंग : अध्यक्षांनी मानले महाजनांचे आभार
म्हापसा : म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या सर्व महाजनांची आमसभा रविवारी देवस्थानच्या सभागृहात अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्या नेतृत्वाखाली झाली. या सभेत सन 2023 – 24 सालच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. संस्थान समितीतील खजिनदाराचे निधन झाल्याने उपखजिनदार श्यामसुंदर पेडणेकर यांना खजिनदारपद देण्याची जोरदार मागणी महाजनांनी केली. अध्यक्ष भाईडकर यांनी कायदेशीर सोपस्कार कऊन पद भरण्यात येणार असल्याचे सांगितले तर सरचिटणीस अॅड. वामन पंडित यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून पेडणेकर यांची नियुक्ती करण्याचे नमूद केले. किरकोळ वाद वगळता ही सभा शांततेत पार पडली. सभेच्या सुऊवातील महाजन बाळू फडके यांना खजिनदाराची सही नसताना अंदाजपत्रक कसे सादर केले असा प्रश्न उपस्थित केला. त्याला साईनाथ राऊळ, नरेश तिवरेकर, अॅड. महेश राणे, अनिल केरकर आदींनी समर्थन दिले. अध्यक्ष भाईडकर यांनी उपखजिनदार पेडणेकर यांनी सही करण्यास नकार दिल्याने सहीशिवाय अंदाजपत्रक सभेसमोर ठेवल्याचे सांगितले. यावेळी काही काळ वातावरण तंग झाले. यावेळी महाजनांनी खजिनदार नियुक्त करण्याचा अधिकार आमसभेला आहे त्यामुळे नवीन खजिनदार नियुक्त करण्याची मागणी केली मात्र ती मागणी अध्dयाक्षांनी फेटाळून लावली तर सरचिटणीस अॅड. वामन पंडित यांनी उपखजिनदार पेडणेकर यांची खजिनदार म्हणून पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगून विषय संपवला व अंदाजपत्रक सभेसमोर सादर केले. अंदाजपत्रकातील हिशोबाबात विविध प्रश्न व आक्षेप महाजनांनी उपस्थित केले. शेवटी अंदाजपत्रकातील त्रुटी सुधाऊन घ्यावे असे सांगून त्याला मान्यता देण्यात आली.
खजिनदार नियुक्तीचे मामलेदारांकडून पत्र नाही : भाईडकर
मामलेदारांनी आपल्याला खजिनदार म्हणून पत्र दिल्याचे उपखजिनदार श्यामसुंदर पेडणेकर सांगतात मात्र तसे पत्र आमच्याकडे आलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रभारी म्हणून अंदाजपत्रकावर सही करण्यास सांगितले. पेडणेकर यांनी खजिनदार म्हणूनच सही करणार असे सांगितल्याने अंदाजपत्रक सहीशिवाय सादर करण्यात आले. हे अंदाजपत्रक सर्वांनी मान्य केल्याने अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी सर्वांचे आभार मानले.