Tarun Bharat

‘NSS’च्या स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यास मंजुरी

पुणे / प्रतिनिधी :

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची संख्या वाढवण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. एकूण 14 विद्यापीठे, संचलनालयांना यासाठी मंजुरी देण्यात आली असून, आता 90 हजार 300 स्वयंसेवकांची यात भर पडणार आहे.

राज्यातील 47 विद्यापीठे, संचलनालये यांना मंजूर केलेल्या 71 हजार 700 स्वयंनिर्वाहित विद्यार्थी संख्येत 14 विद्यापीठे, संचलनालये यांच्या 90 हजार 300 विद्यार्थी संख्येची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण एक लाख 62 हजार स्वयंनिर्वाहित विद्यार्थी संख्या मंजूर करण्यात आली आहे. त्यात प्रवर्गनिहाय विद्यार्थी संख्येत अनुसूचित जातीसाठी 11.8 टक्के, अनुसूचित जमातीसाठी 9.4 टक्के आणि इतरांसाठी 78.8 टक्के, तसेच विशेष शिबिरे-नियमित उपक्रमांसाठी मंजूर विद्यार्थी संख्येच्या 50 टक्के प्रमाणात, अशी विभागणी करण्यात आली आहे.

मंजूर विद्यार्थी संख्या स्वयंनिर्वाहित एकक अंतर्गत असल्यामुळे या विद्यार्थी संख्येसाठी केंद्र शासन किंवा राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जाणार नाही. त्यामुळे या विद्यार्थी संख्येसाठी विद्यापीठ किंवा संचालनालय यांच्याकडे जमा होणाऱ्या शुल्कातून किंवा सर्वसाधारण निधीतून अनुदानाचे वाटप करण्याबाबत शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक वाचा : बेळगावातील हल्ल्याचे पुण्यात पडसाद; कर्नाटकच्या बसेसला फासलं काळं

अनुदानाअभावी उपक्रमांना अडचणी

राज्यात केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांसाठी अनुदान दिले जाते. मात्र आता अनुदान न देता आता स्वयंनिर्वाहित तत्वावर विद्यार्थी संख्या वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अनुदानाअभावी उपक्रमांच्या आयोजनाला मर्यादा येत आहे.

Related Stories

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

Archana Banage

विधानपरिषद निवडणूक : जुना हिशोब चुकता करण्याची दोन्ही गटांना संधी

Abhijeet Khandekar

राज्यपाल कोट्यातून प्रविण काकडे यांना विधान परिषदेवर घ्या

Archana Banage

मोठी बातमी : दहावी व बारावीची परीक्षा पुढे ढकलली

Archana Banage

बिजलिमल्ल माजी आमदार संभाजी पवार यांचे सांगलीत निधन

Archana Banage

आमच्या सभेला सात-आठ हजारांची गर्दी आणि शिवसेनेच्या शाखेसमोर…; नारायण राणेंचा टोला

Archana Banage