Tarun Bharat

अक्रम-सक्रम योजनेंतर्गत घरांना मंजुरी द्या

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

मुडलगी तालुक्मयातील कल्लोळ्ळी गावामध्ये केंद्रीय विद्यालय आणि खेलो इंडिया क्रीडांगणासाठी जागा सर्व्हे करण्यात आला आहे. मात्र त्या ठिकाणी जुनी घरे आहेत. तेव्हा प्रथम त्यांना स्थलांतरित करावे. त्यानंतरच या दोन्ही योजनांसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी कल्लोळ्ळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कल्लोळ्ळी गावामध्ये अनेकांनी घरे बांधली आहेत. मात्र त्यांना अजूनही हक्कपत्रे देण्यात आली नाहीत. 2016-17 मध्ये ती घरे बांधण्यात आली आहेत. तेव्हा अक्रम-सक्रम योजनेतून सर्व घरांना मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

कल्लोळ्ळी गावामध्ये जुनी घरे असल्यामुळे अनेकांनी आपल्या खुल्या जागेमध्ये घरे बांधली. मात्र ती बांधताना ग्राम पंचायतीने कोणतीच परवानगी दिली नाही. याचबरोबर हक्कपत्रेही दिली नाहीत. त्यामुळे आता समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने घरे द्यावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी महादेव कोडलीवाड, यल्लाप्पा गाडीवड्डर, अनिल माळगी, महांतेश मऱयाप्पगोळ, परशुराम गदाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

जिजामाता महिला सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा उत्साहात

Patil_p

कल्याण प्रकरणातील गंगा कुलकर्णीची आत्महत्या

Rohan_P

मच्छे ग्राम पंचायतीमध्ये 15 लाखाची अफरातफर

Patil_p

खानापूर येथील गांधीनगरमध्ये टाऊन कॅफेचा शुभारंभ

Amit Kulkarni

महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱयांना न्याय मिळवून देवू

Patil_p

मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, जिवीतहानी टळली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!