नवी दिल्ली
पीव्हीआर आणि आयनॉक्स यांच्या विलीनीकरणाला अखेर बाजारातील नियामक सेबीने मंजुरी दिली आहे. विलीनीकरणासंदर्भातला एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. गेल्या मार्चमध्ये दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आयनॉक्सचे विलीनीकरण पीव्हीआरमध्ये होणार असून 1500 स्क्रीन्ससह ती आता सर्वात मोठी मल्टीप्लेक्स चेन कंपनी भारतात ठरणार आहे. मंजुरीनंतर विलीनीकरणाची प्रक्रिया 2 ते 3 तिमाहीत पूर्ण होईल, अशी आशा आहे.