बेळगाव : ॲपटेक एव्हिएशन अकॅडमी बेळगावच्या विद्यार्थ्यांनी एव्हिएशन क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. या अकॅडमीच्या वैभव भोसले व सुहाना प्रजापती यांची हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सांबरा-बेळगाव विमानतळाचे उपसरव्यवस्थापक प्रतापराव देसाई उपस्थित होते. उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतापराव देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. ॲपटेक एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक विनोद बामणे व सरस्वती इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती बामणे यांनीही विद्यर्थ्यांचे मनोधैर्य वाढविणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी व प्रशिक्षक उपस्थित होते.
Next Article श्रावण, रक्षाबंधन अन् गणेशोत्सवासाठी बाजारात गर्दी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.