Tarun Bharat

अरेबियन टेनिसपटू जेबॉर अंतिम फेरीत

Advertisements

वृत्तसंस्था/ माद्रीद

डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या 1000 दर्जाच्या मास्टर्स महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत आठव्या मानांकित टय़ुनेशियाच्या जेबॉरने एकेरीची अंतिम फेरी गाठताना ऍलेक्सेंड्रोव्हाचा पराभव केला. डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठणाऱया जेबॉर ही पहिली अरेबियन महिला टेनिसपटू आहे.

गुरूवारी या स्पर्धेतील झालेल्या टय़ुनेशियाच्या जेबॉरने ऍलेक्सांड्रोव्हाचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये 61 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. या सामन्यात जेबॉरने आपल्या अचूक सर्व्हिसवर तसेच बेसलाईन खेळाच्या जोरावर विजय नोंदविला. 2022 च्या टेनिस हंगामात जेबॉरने डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेत दुसऱयांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या चार्लस्टन टेनिस स्पर्धेत जेबॉरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पुढील आठवडय़ात घोषित होणाऱया महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत जेबॉर आठव्या स्थानावर राहील. ती सध्या 10 व्या स्थानावर आहे.

Related Stories

पाक संघ सेमीफायनल निश्चितीसाठी सज्ज

Patil_p

फुटबॉलपटू झेव्हीला कोरोनाची लागण

Patil_p

नापोलीचा सलग पाचवा विजय

Patil_p

जोकोविचला नमवत नदाल उपांत्य फेरीत

Patil_p

शंकर मुथुस्वामीला रौप्यपदक

Patil_p

माद्रिद ओपनमधून जोकोविचची माघार

Patil_p
error: Content is protected !!