Tarun Bharat

आराधना मुलांच्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव येथील किल्ला परिसरात असलेल्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्याविषयी माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शाळेतील माध्यमिक स्तरातील विद्यार्थी मणीकंठ बस्सापुरी, सुषमा पटगुंदी, रिया गोरल, प्रदीप अथणीमठ, मधुरा दुणगावकर आदींनी शाळेचे वर्ग सांभाळले. सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थिनी सुषमा पटगुंदी व रिया गोरल यांनी केले.

यावेळी शिक्षक रशीद भाई, मारुती कुंभार, द्वारकाताई पाटील, किशोर जुवेकर, अश्विनी पवार, नंदा लोहार उपस्थित होत्या. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षिका द्वारकाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपाहार दिला.

Related Stories

जिल्हय़ातील 573 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Patil_p

महिला आघाडी सोसायटीत चोरी

Patil_p

भाजी विक्रीतून सुवर्ण सिंहासनासाठी दिला कर्तव्य निधी

Amit Kulkarni

लोकमान्य दीपावली किल्ला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni

देशातील 70 टक्के जमीन नापीक होईल

Amit Kulkarni

जवारी बटाटा दरात 200 रुपयांनी वाढ

Patil_p