Tarun Bharat

आराधना संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

जागतिक अपंग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आराधना विशेष मुलांच्या शाळेने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकाविले.

जिल्हा अपंग, युवा सबलीकरण पुनर्वसन अधिकारी, महिला आणि बालकल्याण संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातून जवळपास 400 दिव्यांग स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात अराधना स्कूलच्या खेळाडूंनी 100 मी. धावण्याच्या स्पर्धेत मणीकंठ बसापुरीने प्रथम क्रमांक हिरामनी मुचंडीने द्वितीय क्रमांक पटकाविला. 75 मी. धावण्याच्या स्पर्धेत साहिल मोदगेकरने द्वितीय तर अरिहंत जेडीने तृतीय क्रमांक पटकाविला. 50 मी. धावण्याच्या स्पर्धेत हम्माद मोकाशीने प्रथम, चेंडू फेकने लहान गटात काव्या पावलेने द्वितीय, मध्यम गटात सुषमा पटगुंडीने प्रथम क्रमांक, अराईस बागवानने द्वितीय क्रमांक पटकाविला. गोळाफेक स्पर्धेत मधुरा दुधगावकरने द्वितीय तर राणी दुर्गाइने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धकांना शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार, क्रीडा शिक्षक रशिद, शिक्षिका बारकाताई पाटील, मारुती कुंभार, किशोरी जुवेकर, नंदा लोहार, अश्विनी पोवार यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

Related Stories

के. आर. शेट्टी चषक क्रिकेट : साई स्पोर्ट्स, केआर शेट्टी किंग्ज संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगावात दोन कोरोनाबाधित आयसीयुमध्ये

Patil_p

पाईपलाईन रोडवरील सांडपाणी समस्येचे निवारण

Amit Kulkarni

तेलसंग येथे 728 जिलेटिनच्या कांडय़ा जप्त

Amit Kulkarni

फ्लाईंग फिट स्पोर्ट्स कराटे अकादमीला कराटे स्पर्धेत यश

Amit Kulkarni

खोटय़ा खात्यांद्वारे मैत्री, अनेकांच्या खिशाला कात्री

Omkar B