Tarun Bharat

आदेश झुगारून व्यापाऱयांची मनमानी

Advertisements

जनावरांचा आठवडी बाजार बंद, रोग नियंत्रणात आणण्यासाठी आदेश पाळणे आवश्यक 

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील तीन आठवडय़ांपासून लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तरीदेखील काही व्यापाऱयांनी शनिवारी जनावरे विक्रीसाठी आणली होती. मात्र बाजारच बंद राहिल्याने त्यांना जनावरे घेऊन माघारी परतावे लागले. दरम्यान पुढील आदेश येईपर्यंत जनावरांचा बाजार बंद राहणार आहे. याची व्यापारी आणि शेतकऱयांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

लम्पिस्कीन हा संसर्गजन्य आजार बाधित जनावरापासून इतर निरोगी जनावराकडे तात्काळ फैलावतो. शिवाय शर्यती आणि आठवडी बाजारातून या रोगाची झपाटय़ाने लागण होऊ शकते. यासाठी जनावरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र आदेश झुगारून काही व्यापारी जनावरे विक्रीसाठी आणत असल्याचे दिसत आहे. 

तालुक्मयात लम्पिस्कीन संसर्गजन्य आजाराची झपाटय़ाने लागण होत आहे. आतापर्यंत शेकडो जनावरांना या रोगाची लागण होऊन 26 जनावरे दगावली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. महिन्यापूर्वी या रोगाचा शिरकाव तालुक्यात झाला होता. 

प्रशासनाने जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला असला तरी काही व्यापाऱयांकडून मनमानी चालविली जात आहे. बाजार बंद असूनही जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. मात्र रोगाचा प्रादुर्भाव पाहता जनावरे बाहेर काढणेही चुकीचे ठरू शकते. या रोगाची झपाटय़ाने लागण होत असल्याने संबंधित व्यापाऱयांनी याची नोंद घ्यावी, जनावरे विक्रीसाठी आणू नयेत, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे.

लम्पी हा संसर्गजन्य आजार बाधित जनावरावर बसलेल्या डास, माशा आणि गोचडीपासून फैलावत असतो. जनावरांच्या कळपात एखादे जरी बाधित जनावर असल्यास संपूर्ण कळपालाच या रोगाची लागण होऊ शकते. यासाठी जनावरे धुण्यासाठी, चरण्यासाठी आणि शर्यतीसाठी बाहेर सोडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

आयपीएस अधिकाऱयांच्या नावे वसुलीचा फंडा

Patil_p

बाजारपेठेतील गर्दीमुळे धोक्याचा इशारा

Patil_p

वनखात्याच्या समोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी

Amit Kulkarni

रेशन दुकानदारांनाही कोरोना वॉरियर्स म्हणून सुविधा द्या

Patil_p

घरकुलासाठी 50 एकर जमीन ताब्यात घेणार

Patil_p

येळ्ळुरात चिमुकल्यांनी साकारला राजहंसगड

Patil_p
error: Content is protected !!