उपाध्यक्षपदी भरमाणी पाटील यांची निवड
वार्ताहर /किणये
किणये ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी अर्चना रामलिंग चिगरे यांनी बाजी मारली आहे. तर उपाध्यक्षपदी भरमाणी पाटील हे विजयी झाले आहेत. निवडणूकप्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व 22 सदस्य उपस्थित होते.
किणये ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष ही पदे गेल्या दोन महिन्यापासून रिक्त होती. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक कधी होणार याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी किणये ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक मोठय़ा चुरशीने झाली.
ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्ष पदासाठी अर्चना रामलिंग चिगरे (नावगे) व शकुंतला संजय हणबर (बामणवाडी) या दोघींचे अर्ज आले. उपाध्यक्ष पदासाठी भरमानी यल्लाप्पा पाटील (रणकुंडये) व अपुनी यल्लाप्पा पाटील (नावगे) या दोघांचे अर्ज आले.
त्यानंतर बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात आले. यामध्ये अर्चना चिगरे यांना 13 मते मिळाली तर शकुंतला हणबर यांना 9 मते मिळाली. यामुळे चार सदस्यांची अधिक मते घेऊन अर्चना चिगरे यांनी बाजी मारली. तसेच उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीमध्ये भरमानी पाटील यांना 14 मते पडली. तर अपुनी पाटील यांना 8 मते मिळाली, अशी माहिती पीडीओ प्रकाश कुडची यांनी दिली.
निवडणूक अधिकारी म्हणून पीडब्ल्यूडी खात्याचे सुभाष नाईक यांनी कामकाज पाहिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विजयी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या समर्थकांनी दोघांचाही सत्कार करून गुलालाची उधळण करत जल्लोष केला.