तरुण भारत

सांस्कृतिक कला दर्पणची नांदी

यंदाच्या वर्षांपासून चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत कलाकार आणि त्यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी सांस्कृतिक कलादर्पणच्या वतीने गौरव रजनी पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन करत आहेत.

मालिका, चित्रपट, शॉर्ट फिल्म, न्यूज चॅनेल आणि व्यावसायिक नाटक या पाच विभागात हे पुरस्कार विभागले गेले असून, या पाचही विभागातील सर्वोत्कृष्ट अशा कलाकृतींचा सांस्कृतिक कलादर्पण सोहळय़ात गौरव करण्यात येणार आहे. या गौरव सोहळय़ाच्या पहिल्याच वर्षी व्यावसायिक नाटक विभागात रंगभूमीवर गाजत असलेली तब्बल 22 व्यावसायिक नाटकांनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला होता. या 22 कलाकृतींपैकी 7 नाटय़कलाकृतींची निवड शिरीष घाग, भालचंद्र कुबल, रविंद्र आवटी आणि महेश सुभेदार या मान्यवर परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी केली. प्लँचेट, आमने सामने, झुंड, हय़ांच करायचं काय, थोडं तुझं थोडं माझं, सर प्रेमाचं काय करायचं आणि हिमालयाची सावली या 7 नाटकांचा नाटय़महोत्सव  पार पडणार आहे. 99 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते या नाटय़महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच या नाटय़ विभागाची संपूर्ण नामांकने लवकरच जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर चित्रपट महोत्सवाची तारीख आणि 10 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची घोषणा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे अध्यक्ष संस्थापक  चंद्रशेखर सांडवे यांनी कळवले आहे.

Related Stories

कर्करोगाशी झुंजणाऱ्या सोनालीचा प्रवास

triratna

वेबसीरीजसाठी कथानकाची निवड महत्त्वाची : स्वप्निल जोशी

tarunbharat

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 5 फेब्रुवारीपासून प्रारंभ

prashant_c

‘टिप्स’ मारणार मराठी गाण्यांचे शतक

tarunbharat

भावेश पाटील यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे रहस्य

Patil_p

डिसेंबरमध्येच होणार रणबीर-आलियाचं लग्न?

omkar B

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More