तरुण भारत

आरोग्यदायी शीतपेये

उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्याबरोबरच आरोग्यदायी ठरणार्या शीतपेयांचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी काही पर्याय….

ग्रीन टी : उन्हाळ्याच्या दिवसांत रोजच्या चहाचे प्रमाण कमी करुन ग्रीन टीचे सेवन करावे. ग्रीन टी नियमित घेतल्याने ऑस्टिओपायरोसिस, ह्दयरोग, अपचन असे विकार दूर होऊ शकतात. कारण ग्रीन
टीमध्ये पॉलिफेनॉल्स, फ्लेवोनॉईडस तसेच अंटी ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या शिवाय यातील फ्लोराईडसमुळे दात तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते.

पुदिना टी : बर्याच लोकांना बसमध्ये, रेल्वेमध्ये वा अन्य खासगी वाहनांमधून प्रवास करताना चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. अशा व्यक्तींसाठी पुदिन्याचा चहा हा उत्तम पर्याय ठरतो. पुदिन्याचा चहा रोज घेतल्यास केसांशी संबंधित विविध समस्या दूर होण्यास मदत होते. त्याच बरोबर केस लांबसडक, मुलायम, सुंदर होतात. त्यांची चमक वाढते.

सोया मिल्क : दुधामध्ये मिळणारे सर्व प्रकारचे न्यट्रिशियन्स सोया मिल्कमध्ये असतात. त्यामुळे सोया मिल्कचे सेवन आरोग्यदायी ठरते. सोया मिल्कच्या सेवनाने ह्दयाशी संबंधित विकारांची शक्यता बर्याच अंशी कमी होते. अनेक प्रकारचे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स ए आणि डी तसेच लोहाची मात्रा असलेल्या सोया मिल्कमध्ये फॅट जवळजवळ नसतातच. सोया मिल्कमुळे घामाचा त्रास कमी होतो. या शिवाय यातील फाईटोऍस्ट्रोजेन्समुळे  ब्रेस्ट कॅन्सरसारखा गंभीर विकार दूर ठेवण्यास मदत होते.

टोमॅटो ज्यूस : टोमॅटोचे ज्यूसही गुणकारी ठरते. टोमॅटोमध्ये असणार्या लायकोपिनमुळे विविध प्रकारच्या कर्करोगापासून सुटका होते. हे सारे गुणधर्म लक्षात घेऊन या उन्हाळ्यात आरोग्यदायी पेयांचा आस्वाद आवर्जून घ्यायला हवा.

Related Stories

मुलांमधील बध्दकोष्ठता

tarunbharat

विविध गुणांनी युक्त कडुलिंब

omkar B

जपा किडनीचे आरोग्य

tarunbharat

चीनमध्ये ‘कोरोना’ बळींची संख्या 2663 वर

tarunbharat

प्रीमॅच्युअर बेबींमधील आजार

omkar B

चपलेतून विषाणूप्रसार ?

omkar B

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More