तरुण भारत

उद्धव ठाकरेंसह 9 जणांनी घेतली आमदारकीची शपथ

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांनी आज विधानभवनात विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी आमदारांना शपथ दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या सदस्यांचा शपथविधी सोहळा आज छोटेखानी उरकण्यात आला. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांच्यासह भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी शपथ घेतली.  दरम्यान, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर घनगराच्या वेशात विधानभवनात दाखल झाले आहेत. 

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी मुख्यमंत्री ठाकरे आणि  इतर आठ उमेदवार 14 मे रोजी बिनविरोध निवडले गेले. 9 जागांसाठी केवळ 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सर्वजण बिनविरोध निवडले गेले.  ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे 27 मे रोजी मुख्यमंत्री म्हणून 6 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. घटनेतील तरतुदीनुसार 6 महिन्यांतच त्यांना राज्यातील कोणत्याही सभासदाचा सदस्य निवडणे आवश्यक होते. तोपर्यंत त्यांचे मुख्यमंत्रीपद अधांतरीतच होते. मात्र, विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे संकट टळले.

Related Stories

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा

datta jadhav

अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

prashant_c

‘महिंद्रा’कडून आता सॅनिटायझरचेही उत्पादन

prashant_c

आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात

prashant_c

नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तक मागे : प्रकाश जावडेकर

triratna

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

prashant_c

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More