तरुण भारत

कचरामुक्त शहरांची यादी जाहीर

छत्तीसगडचे अंबिकापूर सर्वात स्वच्छ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारकडून कचरामुक्त स्टार रेटिंग (मानांकन ) जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय शहरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलेल्या घोषणेत छत्तीसगडचे अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट, कर्नाटकातील म्हैसूर, मध्यप्रदेशातील इंदोर आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला पंचतारांकिन मानांकन मिळाले आहे.

कर्नाल, नवी दिल्ली, तिरुपती, विजयवाडा, चंदीगड, भिलाईनगर आणि अहमदाबाद यांचा समावेश ‘3-स्टार कचरामुक्त मानांकन’ असलेल्या शहरांमध्ये आहे. तर दिल्ली कँट, वडोदरा, रोहतक ही ‘वन-स्टार कचरामुक्त शहरे’ आहेत.

स्वच्छतेप्रकरणी अंबिकापूर शहराने पुन्हा एकदा आघाडी केली आहे. राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणाच्या नव्या अहवालात पंचतारांकिन मानांकनासह अंबिकापूरला यादीत पहिले स्थान मिळाले आहे. अंबिकापूरमध्ये महिलांच्या गटांकडून घरोघरी जात कचरा गोळा केला जातो. तसेच शहरातील कचऱयावर मोठय़ा प्रमाणावर पुर्नप्रक्रिया केली जाते.

Related Stories

न्यूयॉर्कमधील ‘जनरल अटलांटिक’ कंपनीची ‘जिओ’ मध्ये 6,600 कोटींची गुंतवणूक

pradnya p

धक्कादायक! वृध्द महिलेस बँक म्हणाली.. तुमचा तर मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ?

prashant_c

पंतप्रधान मोदी साधणार देशवासियांशी संवाद

Patil_p

दिल्ली : 45 दिवसांच्या चिमुकलीची झुंज अखेर अपयशी

prashant_c

चित्रीकरण सत्य असल्याची शारजीलची कबुली

Patil_p

लवकरच येणार भारतीय ‘व्हॉट्सऍप’ रविशंकर प्रसाद यांनी केली घोषणा

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More