तरुण भारत

लहान मुले आणि कोरोना

कोरोनाचा आजार हा वयोवृद्ध व्यक्तींना, उतारवयातील व्यक्तींना आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना अधिक प्रमाणात होतो, असे आतापर्यंत मानले जात होते. लहान मुलांना याचा धोका कमी असल्याचे सांगितले जात होते. परंतु गेल्या काही आठवडय़ांमधील आकडेवारी पाहिल्यास अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, स्पेन आणि स्वित्झर्लंडमध्ये किमान शंभर घटना अशा आढळून आल्या आहेत, ज्यात लहान मुलांमध्ये ‘कावासाकी सिंड्रोम’सारखी लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि ही लक्षणे यांचा काय परस्पर संबंध आहे, याचा शोध आता जागतिक आरोग्य संघटना घेत आहे.

 • कावासाकी सिंड्रोम हा असा आजार आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्या, हृदय आणि अन्य अवयवांवर दुष्परिणाम जाणवतात. तीव्र ताप, लो ब्लडप्रेशर आणि श्वास घेण्यात अडथळे येणे ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे सामान्यतः पाच वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांमध्ये दिसून येतात. परंतु भारतात हा आजार पाच वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांमध्येही दिसून आला आहे.
 • ह्यूमॅटिक फीवर या आजाराच्या खालोखाल लहान मुलांमध्ये हृदयरोग उत्पन्न करणारे हे सर्वांत मोठे कारण आहे.
 • कावासाकी सिंड्रोम पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या एक लाख मुलांपैकी सरासरी 150 मुलांमध्ये आढळून येतो.
 • ½लोबल कार्डिओलॉजी सायन्स या संस्थेच्या अध्ययनानुसार, भारतात याविषयीची परिस्थिती वाईट आहे आणि त्याचे कारण म्हणजे, बर्याच मुलांमध्ये या आजाराचे निदानच लवकर होत नाही. दुसरीकडे,
 • मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत या आजाराचे प्रमाण अधिक आढळते भारतात मुलांमध्ये आणि मुलींमध्ये या आजाराचे प्रमाण 1.5ः1 असे आहे. अर्थात, कोरोनाच्या संक्रमणकाळात अद्याप भारतात या आजाराचा शिरकाव झाल्याचे आढळलेले नाही.
 • युरोप आणि अमेरिकेत या नवीन आजाराने ग्रस्त असलेली जी मुले रुग्णालयांत दाखल झाली आहेत, त्यातील अनेक मुलांच्या शरीरात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याचेही आढळून आले आहे; परंतु काही मुलांमध्ये मात्र कोरोनाचा संसर्ग आढळून आलेला नाही.
 • यातून तीन अर्थ काढता येतात. एक म्हणजे, हा आजार कोविड-19 शी संबंधित नसावा. दुसरा अर्थ असा की, ज्या मुलांच्या तपासणीत कोरोनाचा विषाणू आढळून आला नाही, तो तपासणीपूर्वी नष्ट झाला किंवा तिसरा अर्थ असा की, ज्या मुलांच्या तपासणीत कोरोना विषाणू आढळला नाही, त्यांचा चाचणी अहवाल सदोष असावा.
 • कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिसाद म्हणून या मुलांच्या शरीरात गंभीर जळजळ आढळून आली. परंतु वयस्क व्यक्तींमध्ये ज्याप्रमाणे फुफ्फुसाचा गंभीर आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवतो, तसा परिणाम या मुलांमध्ये झाल्याचे आढळले नाही.
 • या मुद्द्यावरील एका सविस्तर अहवालात असे दिसून येते की, कोरोनाची गंभीर लक्षणे असलेले जेवढे रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, त्यात लहान मुलांचे प्रमाण अवघा एक टक्का एवढेच आहे.
 • मुलांच्या शरीरावर किंवा चेहर्यावर पिवळेपणा, शरीरास स्पर्श केल्यावर अपेक्षेपेक्षा शरीर थंड लागणे, श्वास घेण्यात अडथळे, ओठांवर निळी छटा, एखाद्या आजाराचा झटका, सुस्ती किंवा निष्क्रियता, शरीरावर रॅशेस उठणे, या रॅशेसवर जोराने दाब दिला तरी वेदना न होणे आणि मुले खूप जोरजोराने रडणे अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
 • ¡कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत लहान मुले कमी संवेदनशील असल्याचे आढळून आले असले, तरी चीनमधील आकडेवारी समजून घेतली पाहिजे.
 • चीनच्या सीडीसीच्या प्राथमिक आकडेवारीवरून असे दिसून येते की, मुलांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत नाही आणि 13 टक्के ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांमध्येही कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली नाहीत. त्यानंतर जेव्हा पॉझिटिव्ह आणि अनुमानित रुग्णांचे एकत्रीकरण करून आकडेवारी समोर आली, तेव्हा सहा ते दहा वर्षे वयोगटातील सुमारे एक तृतीयांश मुले ‘एसिम्प्टोमॅटिक’ म्हणजे कोणतीही लक्षणे न दिसणारी आढळून आली. याचा अर्थ काय होतो?
 • तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुलांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे विकसित होत नसली, तरी त्यांच्या माध्यमातून संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा धोका मात्र कमी होत नाही.

Related Stories

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

triratna

दहशत नकोः दक्षता हवी

tarunbharat

ब्रेन टय़ुमरची लक्षणे ओळख

tarunbharat

यात असतात कार्बोदकं… डाएट अँड न्यूट्रिशन

tarunbharat

कोरोना आणि भाजीपाला

omkar B

जपा किडनीचे आरोग्य

tarunbharat

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More