तरुण भारत

देशात 24 तासात 6088 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील 24 तासात 4630 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1 लाख  18 हजार 448 वर पोहचली असून, मृतांची संख्या 3583 एवढी आहे. 

सध्या देशात 66 हजार 303 ॲक्टिव कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 48 हजार 534 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 40.97 टक्के आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात 41 हजार 642 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 13 हजार 967, गुजरातमध्ये 12 हजार 910 तर दिल्लीत 11 हजार 659, राजस्थान 6227, मध्यप्रदेश 5981 तर पश्चिम बंगालमध्ये 3197 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 

Related Stories

कोरोना रुग्णसंख्येचा एकदिवशीय उच्चांक

Patil_p

ओडिशामध्ये आता मृत कोरोना योद्धय़ांना हुतात्म्याचा दर्जा

Patil_p

इंदोरमध्ये समूह संसर्गाची भीती वाढली

Patil_p

गिलगिट-बाल्टिस्तानही भारताचेच

Patil_p

‘एसबीआय कार्ड्स’ लिस्टिंगवर कोरोनाची छाया

tarunbharat

अर्थसंकल्पावर गांधीहत्येचे दृश्य

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More